शिवेंद्रसिंहराजे छान दिसतात, त्यांचा सिनेमा सुपरहिट होईल! 

मुल मांडीवर घेतल्यावर त्याने हे केले तर कोणी मांडी कापत नाही की मुलाला मारत नाही.
शिवेंद्रसिंहराजे छान दिसतात, त्यांचा सिनेमा सुपरहिट होईल!
शिवेंद्रसिंहराजे छान दिसतात, त्यांचा सिनेमा सुपरहिट होईल!

सातारा: दाढी वाढवल्याने शिवेंद्रसिंहराजे छान दिसतात. त्यांनी आता सिनेमात काम करावे, अशी टोलेबाजी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली. 

उदयनराजे- शिवेंद्रराजे संघर्ष जुना आहे. कधी त्यांचे मनोमीलन असते तर कधी सुप्त संघर्ष. काही दिवसांपुर्वी राष्ट्रवादी पक्षात एकत्र असलेले हे दोन्ही चुलत बंधू भाजपमध्ये पुन्हा एकत्र येण्याची शक्यता आहे. दोन आठवड्यापुर्वी शिवेंद्रसिंहराजे यांनी भाजपप्रवेश केला आहे. उदयनराजेंचा काही दिवसांत भाजपप्रवेश होवू शकतो.

यापार्श्वभुमीवर उदयनराजे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शिवेंद्रसिंहराजेंबाबत विचारल्यावर ते म्हणाले, तेही राजे आहेत. ते big people आहेत. धाकटा भाऊ आहे, त्याच्यासाठी केले पाहिजे. मुल मांडीवर घेतल्यावर त्याने हे केले तर कोणी मांडी कापत नाही की मुलाला मारत नाही. ते लाडके आहेत, आता तर दाढी वाढविल्याने छान दिसतात. माझे तर म्हणणे आहे त्यांनी पिक्चरमध्ये काम करावे, तो पिक्चर सुपरहिट होईल. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com