udyanraje questions about wine shop | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

एक दारूचे दुकान बंद झाल्यावर अनेकांचे कल्याण होत असेल तर मी काय चुकीचे करतोय?

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 25 ऑक्टोबर 2018

मला काय पडलयं निवांत एसी गाडीतून फिरत बसेन आणि दुर्लक्ष करीन. पण तसं होत नाही ना, हृदयात रूततयं ना.

- उदयनराजे भोसले

सातारा : 'विश्‍वास गमवला तर कितीही आटापिटा केलातरी परत येत नाही. तुमची काळजी वाटणारा मित्र म्हणून कायम तुमच्यासोबत असणार आहे. आज मी आहे, उद्या मी नसेन. परखडपणे बोलतोय फॅक्‍ट ईज फॅक्‍ट बेबी....ब्रुस वेरिसचा पिक्‍चर बघितला ना...त्यात अंगठी असते फॅक्‍ट ईज फॅक्‍ट बेबी...', अशा शब्दांत खासदार उदयनराजे भोसले यांनी आपली भूमिका मांडली.

दारू दुकानावरून झालेल्या वादावरून दोन्ही राजांसह समर्थकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणात जामीनासाठी उदयनराजे आज त्यांच्या समर्थकांसह जिल्हा न्यायालयात आले होते. तेथील काम झाल्यावर त्यांनी ऑफिसर्स क्‍लबला पत्रकारांशी संवाद साधून आपली भुमिका मांडली. 

 

ते म्हणाले, अन्याय होतो, मारहाण होते किती तुमची दाद घेतली जाते? मी तत्वाशी बांधिल आहे. मी बोलतो तेच करतो. मला अन्याय सहन होत नाही. कोणी असो अगदी शिवेंद्रराजेंवरही अन्याय झालेला मी खपवून घेणार नाही. पण प्रत्येकाने विचार करावा. आपण कोणत्या कुटुंबात जन्माला आलो आहे. संपूर्ण मंडईत जागा खुटाळ्यांची. मंडईला महिला जातात. तिथे ट्रक थांब्याचे आरक्षण आहे. तिथे देशी दारूचे दुकान चालू ठेवले आहे. यावर विश्‍वास ठेऊ नका, जाऊन बघा. थेटर बंद पडले कारण सगळे ढोसतात आणि तेथे जातात. एक दारूचे दुकान बंद झाल्यावर अनेकांचे कल्याण होत असेल आणि तीच भुमिका मी पार पाडत असेल तर मी काय चुकीचे काम करतोय?
 
आमदार या नात्याने धाकटे बंधूराजांनी त्यांच्या जवळच्या मित्रांना सांगायला पाहिजे. असेही नाही की त्यांच्याकडे जागा नाही. बाजूला कुठेतरी जागा करायला हवी होती. लोकांना नाहक त्रास करत असेल तर कोण ऐकूण घेणार? मी विचार मांडले त्यात मला दोषी मानत असाल तर लोकांवर अन्याय सहन करू देणार नाही. अनेक लोक इश्‍युचा नॉन इश्‍यु करतात. कोणीही असो पक्ष कोणताही असो अन्याय झाला तर वाटेल त्या परिस्थितीत सहन करणार नाही. तुम्ही आम्हाला विश्‍वासाने निवडुन दिले आहे. या विश्‍वासाला पात्र होणे हे आमची जबाबदारी आहे. हितचिंतक म्हणून तुमच्या काळजी वाटणारा मित्र म्हणून कायम तुमच्यासोबत असणार आहे. तुम्ही घ्या ना पुढाकर तुम्ही का घेत नाही. का सारखा उदयनराजे पाहिजे. आज मी आहे उद्या मी नसेन सुध्दा. माझी एकट्याची जबाबदारी नाही ये. परखड पणे बोलतोय फॅक्‍ट ईज फॅक्‍ट बेबी....ब्रुस वेरिसचा पिक्‍चर बघितला ना...त्यात अंगठी असते फॅक्‍ट ईज फॅक्‍ट बेबी... , असे उदयनराजे म्हणाले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख