आणखी काही भेट दिले तर मोदींचे हेलिकॉप्टर उडणार नाही!

भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच तीन महिन्यात कोणी खासदाराने राजीनामा दिला असेल. पण का दिला याचा सर्वांनी विचार करायला हवा, कारण आपल्या भागाचा विकास झाला पाहिजे, ही माझी भुमिका आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आणखी काही भेट दिले तर मोदींचे हेलिकॉप्टर उडणार नाही!

सातारा : पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच सातारा जिल्ह्यात येत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी आम्ही कंदी पेढ्याचा हार आणि मेघडंबरीचे स्मृतीचिन्ह, चांदीची राजमुद्रा आणि जुन्या पध्दतीची तलवार भेट देणार आहोत, अशी माहिती सातारा लोकसभेचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी वाईतील पत्रकार परिषदेत दिली.

उदयनराजे म्हणाले, साताऱ्यासाठी काय करता येईल, हे विचार करून ठरवून आम्ही त्यांच्यापुढे मागणी करणार आहोत. तसेच त्यांच्या स्वागतासाठी आम्ही सातारी कंदी पेढ्यांचा हार, मेघडमरीचे स्मृतिचिन्ह, चांदीची राजमुद्रा, जुन्या पध्दतीची तलवार भेट देणार आहोत. आणखी जास्त काही भेट दिले तर हेलिकॉप्टर उडणार नाही, असेही ते मिश्‍किलपणे म्हणाले.  

यापूर्वी राष्ट्रवादीत खासदार शरद पवार आणि आमदार शशिकांत शिंदे यांनी तुमची पाठराखण केली. मग बिघडले कुठे, या प्रश्‍नावर उदयनराजे म्हणाले, हो, सगळ्यांनी माझी पाठराखण केली. इतकी पाठराखण केली की माझ्या साध्या वाढदिवसाला कोणी उपस्थित राहले नाहीत. सगळ्यांनी बहिष्कार टाकला. अमोल कोल्हे हे तर माझे मित्र आहेत. माझा कोणी शत्रू नाही. मी बोलतो ते परखडपणे बोलतो. का बोलतो तर लोकांच्या हितासाठी बोलतो. मागील 15 वर्षात विविध योजना रखडल्या नसत्या तर मी बोललो नसतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com