उदयनराजेंना मानाचा मुजरा; राऊत, धीर धरा!

असे अनेक तरुण मला भेटतात जे म्हणतात, तुमचे बाबा आमचे हिरो आहेत, त्याचा अभिमान मला आजही वाटतो , असं धीरज देशमुखांनी सांगितलं.
udyanraje is king so raut should wait
udyanraje is king so raut should wait

संगमनेर : 'उदयनराजे हे श्रद्धास्थानी आहेत. राजांना मानाचा मुजरा. बाकीच्यांनी धीर धरावा', अशा शब्दांत आमदार धीरज देशमुख यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना सल्ला दिला आहे. 

संगमनेर येथे युवा संवाद हा कार्यक्रम झाला. त्यात मंत्री आदित्य ठाकरे, आदिती तटकरे, आमदार रोहित पवार, धीरज देशमुख, झिशान सिद्धीकी हे सहभागी झाले होते. त्यांची मुलाखत गायक अवधूत गुप्ते यांनी घेतली. त्यावेळी त्यांनी विचारलेल्या प्रश्‍नांना धीरज यांनी दिलखुलास उत्तरे दिली.


धीरज देशमुख यांना विचारलेले रॅपिड फायर

धीर कोणी धरावा? उदयनराजे की संजय राऊत

उत्तर - संजय राऊत (अप्रत्यक्ष उत्तर)

करिअर निवडताना बॉलिवूड आणि राजकारण यांच्यापैकी राजकारणाचं पारडं कसं जड झालं, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, लहान भाऊ म्हणून नेहमी माझ्यासमोर एक प्रश्न होता. मोठे भाऊ जे काम करतात त्यांच्या पावलांवर पाऊल टाकत समोर जाण्याचे संस्कार घरातूनच झाले. त्यांचीही हीच अपेक्षा होती. माझा एक भाऊ राजकारणात आहे एक बॉलिवूडमध्ये.

माझे बाबाच हिरो
बाबांचा प्रवास आमदारकी, मंत्रीपद ते मुख्यमंत्री असा झालेला मी पाहिला. एक मुलगा म्हणून खंत असायची की माझे बाबा माझ्यासोबत कमी वेळ घालवतात. मला वडिलांचा सहवास फार मिळाला नाही. पण आज, निवडणूक लढताना, सभागृहात जाताना मला बाबा समजायला लागले, त्यामुळे बाबांनी समाजासाठी खूप केल्याचं जाणवलं. एखादा व्यक्ती आपल्या कुटुंबासाठी खूप काही करु शकतो, पण इतरांच्या कुटुंबासाठी किती करु शकतो. माझे बाबा माझ्यासाठी हिरो आहेत, पण असे अनेक तरुण मला भेटतात जे म्हणतात, तुमचे बाबा आमचे हिरो आहेत, त्याचा अभिमान मला आजही वाटतो , असं धीरज देशमुखांनी सांगितलं.

थोरातांबद्दल मोठा खुलासा
बाळासाहेब थोरात हे लातूरचे पालकमंत्री होते. त्यामुळे त्यांच्याशी आमचा स्नेह होता. बाबा मुख्यमंत्री असल्याने त्यांच्यासोबत विमानात फिरण्याचा छंद पूर्ण व्हायचा. बाळासाहेबांच्या आणि साहेबांच्या जेव्हाही बैठका किंवा दौरा असायचा. लातूरची कुठलीही अडचण असेल तर ते आवर्जून बाळासाहेबांना फोन करायचे, बाबांना माहित होतं की नगरपेक्षा जास्त न्याय ते लातूरला देऊ शकतील. 1999 साली बाळासाहेबांनी थोरात यांनी बाबांकडून कृषी खातं मागितलं आणि बाबांनी ते लगेच दिलं, असे धीरज यांनी सांगितलं.

महाराष्ट्रात विकासाचाच पॅटर्न
महाविकास आघाडी सरकारचे काही निर्णय हे दुष्काळमुक्तीसाठी घेण्यात आले आहेत. संपूर्ण मंत्रिमंडळ त्या विचाराने चालत आहे. महाराष्ट्र हा नंबर एक होता आणि राहील हेच बाबाचं स्वप्न होतं. महाविकास आघाडीच्या माध्यमातून यापुढे महाराष्ट्रात विकासाचाच पॅटर्न चालेलं, असा विश्वास धीरज देशमुख यांनी केला.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com