udyanraje to join bjp in presence of amit shah | Sarkarnama

अमित शहांच्या उपस्थितीत होणार उदयनराजेंचा भाजपप्रवेश

सागर आव्हाड
गुरुवार, 12 सप्टेंबर 2019

पुणे : राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर ते राष्ट्रवादीत कायम राहणार असल्याची चर्चा सुरु झाली. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही आज पुन्हा उदयनराजे यांच्या भाजप प्रवेशाला फोडणी दिली. उदयनराजे हे भाजपात येतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. दिल्लीत जाऊन अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होईल, असेही त्यांनी सांगितले.

पुण्यात ते गणेश विसर्जन मिरवणुकीत पत्रकारांशी बोलत होते. त्यांनी सांगितले की उदयनराजे भोसले आणि मुख्यमंत्री संपर्कात आहेत. दोघांचे नियमित संवाद सुरु आहेत. परवा दीड तास दोघांत संवाद झाला असून त्यांना कार्यकर्त्यांशी अजून चर्चा करायची आहे. त्यानंतर पक्ष प्रवेश आणि राजीनाम्यावर निर्णय घेतील.

यंदाच्या गणेशोत्सव वर दुष्काळ आणि पुराचं सावट गणपती उत्सवावर होते. माञ दहा दिवस उत्साहात साजरा झाल्याचं त्यांनी सांगितले.  बारामती विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांचा  पराभूत करु असं म्हणणारा मी कच्चा राजकारणी नाही तर 2024 लोकसभा हे आमचं लक्ष्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मनसेच्या पुणे शहर महिला आघाडीच्या अध्यक्षा रुपाली पाटील यांच्याशी काही दुश्मनी नाही. त्यामुळे त्यांना विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्यास प्रतिबंध करण्यात माझा हात नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख