udyanraje greets sharad pawar | Sarkarnama

शरद पवारांशी बोलल्यावर उदयनराजेंचे मन झाले हलके!

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 13 डिसेंबर 2019

उदयनराजे यांनी वाढदिवसानिमित्त शरद पवार यांना शुभेच्छा देत हा तणाव संपवला.

पुणे: उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीच्या खासदारकीचा राजीनामा देवून भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून शरद पवार व त्यांच्यात तणाव निर्माण झाला होता. आज उदयनराजे यांनी वाढदिवसानिमित्त शरद पवार यांना शुभेच्छा देत हा तणाव संपवला.

विधानसभा निवडणुकीअगोदर शरद पवार यांचे एकएक शिलेदार भाजपमध्ये जात असताना उदयनराजे यांनी भाजपमध्ये प्रवेश करत पवारांना मोठा धक्का दिला होता. त्याचे पडसाद राज्यभर उमटले होते. त्यांच्या या निर्णयाला समर्थकांतूनही विरोध झाला होता. यादरम्यान उदयनराजे भावूकही झाले होते. शरद पवार हे माझ्या वडिलांप्रमाणे असल्याचे विधान त्यांनी केले होते. त्यानंतर लोकसभेची पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.  

आज शरद पवारांचा वाढदिवस मुंबईत साजरा झाला. पवार दिवसभर कार्यक्रमात व्यस्त होते. त्यामुळे उदयनराजे यांनी रात्री 10 च्या सुमारास पवारांना फोन केला आणि शुभेच्छा दिल्या.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख