udyanraje can be arrested anytime | Sarkarnama

उदयनराजेंना कधीही अटक होणार 

सरकारनामा ब्युरो 
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

खासदार उदयनराजे भोसले यांचा खंडणी प्रकरणात अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एन. शिरसीकर यांनी उच्च न्यायालयात जाण्यासाठी मागितलेली मुदत ही नाकारली. त्यामुळे खासदारांना कधीही अटक होऊ शकते. 

सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांचा खंडणी प्रकरणात अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एन. शिरसीकर यांनी उच्च
न्यायालयात जाण्यासाठी मागितलेली मुदत ही नाकारली. त्यामुळे खासदारांना कधीही अटक होऊ शकते. 

लोणंद औद्योगिक वसाहतीमधील सोना अलाईज कंपनीचे मालक राजेश जैन यांना खंडणीसाठी मारहाण केल्याप्रकरणी खासदार उदयनराजेंसह अन्य संशयितांवर
सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर खासदार उदयनराजे यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला
होता. 23 मार्च रोजी न्यायालयाने त्यांना तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश शिरसीकर यांनी सरकारपक्षाने मांडलेले म्हणणे ग्राह्य मानत मंगळवारी उदयनराजे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केला. त्यामुळे त्यांना अटक करण्याचा मार्ग पोलिसांसाठी मोकळा झाला होता. बुधवारी उदयनराजे यांच्या वतीने न्यायालयात आणखी एक अर्ज दाखल करण्यात आला. उच्च न्यायालयात अपील करण्यासाठी मुदत मिळावी अशी मागणी त्या अर्जाद्वारे केली होती. मात्र, न्यायालयाने तो अर्जही फेटाळला आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख