शिवाजी महाराजांची जेम्म लेनने बदनामी केली तेव्हा शिवसेना कुठे होती ? उदयनराजेंचा सवाल 

शिवाजी महाराजांची जेम्म लेनने बदनामी केली तेव्हा शिवसेना कुठे होती ? उदयनराजेंचा सवाल 

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांची जेम्स लेनने बदनामी केली तेव्हा आम्ही पेटून उठलो होतो, तेव्हा शिवसेना कुठे होती ? असा संतप्त सवाल भाजपचे नेते आणि माजी खासदार उदनराजे भोसले यांनी केला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करण्यावरून नाराजी व्यक्त केली. या लोकांनी बुद्धी गहाण ठेवली आहे का काय असा प्रश्न पडतो असेही ते म्हणाले. 

जय भगवान गोयल यांच्या पुस्तकाबद्दल ऐकून वाईट वाटलं. महाराजांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला वाईट वाटलं. महाराजांसोबत तुलना होईल इतकी जगात कोणाचीही उंची नाही असेही ते म्हणाले. यापुढे शिवाजीमहाराजांची बदनामी कराल तर खपवून घेणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. 

एक युगपुरुष जन्माला येतो, ते आमचे शिवाजी महाराज. जाणता राजा फक्त आणि फक्त शिवाजी महाराजच आहेत. जेव्हा तुम्ही कोणलाही ही उपमा देत असता तेव्हा विचार करायला हवा. इतर कोणालाही ही उपमा लावली जात आहे, त्याचाही मी निषेध करतो. 

आजके शिवाजी नरेंद्र मोदी या वादग्रस्त पुस्तकावरुन सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर उदयनराजे भोसले यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. 

छत्रपती शाहू महाराज, प्रबोधनकार ठाकरे यांच्याविषयी नम्रपणे आदर व्यक्त करतानाच शिवसेनेला टोले लगावतानाच शिवसेनेची जागा त्यांनी दाखवून दिली. शिवसेना भवनावर शिवाजी महाराजांची प्रतिमा कुठे लावली आहे असा सवालही शिवसेनेला केला आहे. 

तुमच्या गलिच्छ राजकारणाचं खापर आमच्या माथ्यावर फोडू नका असा सल्लाही ते सर्व पक्षांना द्यायला विसरले नाहीत.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com