udyanraje and fadavnis fly for dehli | Sarkarnama

भेटल्या भेटल्या अलिंगन दिले अन मग दोघे दिल्लीला निघाले!

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019

उदयनराजे दिल्लीत पोहचताच लोकसभा अध्यक्षांकडे राजीनामा देणार आहेत. सकाळी त्यांचा भाजपप्रवेश होईल.

पुणे : साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजपप्रवेशासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रात्री पावणे दहा वाजता पुणे विमानतळावर पोहचले. भेटल्या भेटल्या दोघांनी एकमेकांना अलिंगन दिले.

फडणवीस हे दिवसभर नगर जिल्ह्यात होते. त्यांनी महाजनादेश यात्रेंतर्गत सभा, रॅली केल्या. त्या संपवून ते पुणे विमानतळावर आले. त्यांच्यासोबत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन होते. विमानतळावर उदयनराजे व फडणवीस भेटताच दोघांनी एकमेकांना अलिंगन दिले. त्यानंतर विशेष विमानाने ते दिल्लीला रवाना झाले. 

उदयनराजे दिल्लीत पोहचताच लोकसभा अध्यक्षांकडे राजीनामा देणार आहेत. सकाळी त्यांचा भाजपप्रवेश होईल.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख