राज्यसभेवर जाण्याइतका मी वयस्कर नाही!

तुमच्या सोबत कार्यकर्तेही भाजपमध्ये येणार आहेत का, यावर ते म्हणाले, सगळे तरूण सज्ञान आहेत. त्यांच्या आयुष्याचे त्यांनी ठरवायचे असते. मी दिशा देण्याचे काम करू शकत नाही. मात्र, ते माझे मित्र राहतील वैयक्तिक पातळीवर ज्यांना त्यांना पटले ते त्यांनी करावे.
राज्यसभेवर जाण्याइतका मी वयस्कर नाही!

सातारा : राष्ट्रवादी सोडली असली तरी सर्वजण माझे मित्र राहतील. मी कोणाला शत्रू मानत नाही. मागील पाच वर्षात कामे झाली नसती तर मला लोकांनी विचारले असते. लोकहिताची कामे करताना मला भांडावे लागले. भाजप प्रवेशाचा निर्णय माझा स्वत:चा असून यासंदर्भात मी शरद पवारांशी बोललो होतो. राज्यसभेवर जाण्यास मी इतका वयस्कर झालेलो नाही, असे स्पष्टीकरण माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी आज व्यक्त केले.

भाजप प्रवेशानंतर आज सायंकाळी सहा वाजता खासदार उदयनराजे भोसले यांचे साताऱ्यात आगमन झाले. येथील शासकिय विश्रामगृहात त्यांचे समर्थकांसह कार्यकर्त्यांनी फटाक्‍याच्या आतषबाजीत स्वागत केले. नगराध्यक्षा माधवी कदम यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, तसेच सातारा विकास आघाडीचे सर्व नगरसेवक उपस्थित होते.

यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, पहिल्या तीन महिन्यात खासदारकीचा राजीनामा देणारा मी देशातील पहिला खासदार आहे. मला अपेक्षित मतदान निवडणुकीत झाले नाही. ते का झाले नाही यांच्या तपशिलात मला जायचे नाही. काहींनी सोयीप्रमाणे उलटे सुलटे केले. आजपर्यंत मी समाजकारण केले. राजकारण केले असते तर मोठी पदे घेतली असती. पदामुळे माणसाची ओळख नसते कार्यातून ओळख होते. मला मनाला, बुध्दीला वाटले त्यानुसार मी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पक्षात मला एकीकडे उमेदवारी दिली आणि दुसरीकडे टार्गेट केले. तरीही मी सर्वांचा आदर करतो.  

आता विकासाची कामे मोठ्या प्रमाणात होणार आहेत. यापूर्वी कामे झाली असती तर ही वेळ आली नसती. माझ्या सर्व हितचिंतकांचे मी आभार मानतो. कारण त्यांनी माझी खुप काळजी घेतली. मी पक्ष सोडला असला तरी ते माझे मित्र राहतील. मी कोणाला शत्रू मानत नाही.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com