उद्धव ठाकरेंची अयोध्येत जाहीर सभा नव्हे, तर 'जनसंवाद'

उध्दव ठाकरे यांची जाहीर सभा होणार नसली तरी देशाच्या कानाकोपऱ्यातून 24 व 25 रोजी अयोध्येत येणाऱ्या शिवसैनिकांशी 'जनसंवाद' होणार आहे. त्यासाठी गुलाबवाडी येथे जय्यत तयारी देखील करण्यात आली आहे.
Shivsena-Udhhav-Ayodhya.
Shivsena-Udhhav-Ayodhya.

औरंगाबादः शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची उत्कंठा शिगेला पोचत असतांनाच आता त्यांची आयोध्येत जाहीर सभाच होणार नसल्याची माहिती समोर आली आहे. 

या संदर्भात अयोध्या दौऱ्याचे समन्वयक असलेले औरंगाबाद शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी उध्दव ठाकरे यांची सभा नव्हे तर जनसंवाद कार्यक्रम होणार असल्याचे 'सरकारनामा'शी बोलतांना सांगितले. 

येत्या 24 व 25 नोव्हेंबर रोजी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जात आहेत. राम मंदिराचा मुद्दा हाती घेऊन आयोध्येतील साधू-संतांची भेट, महाआरती आणि शरयू नदीचे पूजन त्यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रासह देशभरातून शिवसैनिक आयोध्येत येणार असल्याचा दावा शिवसेनेकडून केला जातोय. 

गेल्या महिन्यात मराठवाडा दौऱ्यावर आलेल्या उद्धव ठाकरे यांनी अयोध्येतील राम मंदिरासमोर उभा राहूनच " राम मंदिराचा मुद्दा देखील चुनावी जुमला होता का?' असा सवाल आपण पंतप्रधान मोदींना विचारणार असल्याचे कार्यकर्ता मेळाव्यात बोलतांना जाहीर केले होते. शिवसेनेच्या वतीने देण्यात आलेल्या आयोध्या दौऱ्याच्या माहितीमध्ये देखील उध्दव ठाकरे यांची जाहीर सभा होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. 

सभेला परवानगी नाही ? 

राम मंदिराच्या मुद्यावर उध्दव ठाकरे यांची अयोध्येत कुठल्याही परिस्थीतीत जाहीर सभा होता कामा नये असे आदेश योगी सरकारच्या वतीने प्रशासनाला देण्यात आल्याची जोरदार चर्चा आहे. या पार्श्‍वभूमीवर आयोध्येत सभा घेण्यास शिवसेनेला परवानगी नाकारल्याचे बोलले जाते. त्यामुळे उध्दव ठाकरे यांची सभा होणार की नाही याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. 

या संदर्भात आयोध्या दौऱ्याचे समन्वयक अंबादास दानवे यांच्यांशी संपर्क साधला असता ते म्हणाले, "शिवसेनेने आयोध्येत उध्दव ठाकरे यांची जाहीर सभा होणार असे कधीच सांगितले नव्हते, त्यामुळे सभेसाठी परवानगी मागण्याचा व ती नाकारण्याचा प्रश्‍नच येत नाही. उध्दव साहेबांचे नियोजित कार्यक्रम कोणत्याही अडथळ्याविना पार पडणार आहेत. "

"उध्दव ठाकरे यांची जाहीर सभा होणार नसली तरी देशाच्या कानाकोपऱ्यातून 24 व 25 रोजी आयोध्येत येणाऱ्या शिवसैनिकांशी 'जनसंवाद' होणार आहे. त्यासाठी गुलाबवाडी येथे जय्यत तयारी देखील करण्यात आली आहे. त्यामुळे सभा रद्द झाली अशा अफवा पसरवल्या जात आहेत." असेही ते म्हणाले . 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com