शिवनेरीवरून राजमाता जिजाऊ आणि शिवरायांचे आशीर्वाद घेऊन जातोय :  उद्धव ठाकरे

शिवनेरीवरची ही पवित्र माती म्हणजे हिंदूंच्या भावनानाचे प्रतीक आहे. येथे मी पवित्र आणि शुद्ध भावनेने आलो. खरंच राम मंदिर उभरायच असेल तर सर्वांनी एकत्र यायला हवं.-उद्धव ठाकरे
ut shivneri
ut shivneri

पुणे : " शिवनेरीवरून  राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवरायांचे आशीर्वाद घेऊन अयोध्येला जातोय," असे शिवसेना प्रमुख  उद्धव ठाकरे यांनी शिवनेरी गडावर बोलताना सांगितले . 


शिवसेना प्रमुख  उद्धव ठाकरे अयोध्येला जाण्यापूर्वी आज शिवनेरी गडावर आले होते .  राम मंदिरासाठी शिवनेरी गडावरची माती त्यांनी यावेळी गोळा केली .

शिवनेरीवरची ही पवित्र माती म्हणजे हिंदूंच्या भावनानाचे प्रतीक आहे. येथे मी पवित्र आणि शुद्ध भावनेने आलो. खरंच राम मंदिर उभरायच असेल तर सर्वांनी एकत्र यायला हवं,असे उद्धव ठाकरे म्हणाले . 

यावेळी त्यांच्यासमवेत खासदार आढळराव पाटील आणि शिवसेनेचे नेते उपस्थित होते . 

यावेळी बोलताना श्री. ठाकरे म्हणाले ," शिवसेनेने हा मुद्दा निवडणुकीसाठी घेतलाय असा प्रश्न विचारला जातोय. होय, निवडणूक समोर दिसत असतानाच मी हा मुद्दा घेतलाय, कारण मला ताकाला जाऊन भांडं लापवण्याची सवय नाही. भांडं लपवण्याची मला गरज नाही, पण मला काही जणांचा भांडाफोड करायचाय."

श्री . ठाकरे पुढे म्हणाले , " प्रत्येक वेळी निवडणुका आल्यावर राम मंदिर वही बनाऐंगे ही घोषणा दिली जाते, ती किती पिढ्या ऐकायची? आता हे सरकार येऊन साडे चार वर्षे झाली. परत सहा महिन्यात निवडणूक आहे. आधीची सरकारे मिली-जुली होती. आताचं सरकार मजबूत आहे. राजकारण करण्यासाठी अयोध्येला अजिबात चाललेलो नाही. राम मंदिराचा विषय बाजूला पडला होता."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com