गंगापूरकरांचे शिवसेनेवरील प्रेम आटले का? : उध्दव ठाकरे

लोकसभा निवडणुकीत गंगापूर मधून अपक्ष हर्षवर्धन जाधव यांना 64 हजारमत मिळाल्याच्या मुद्यालाउध्दव ठाकरे यांनी हात घातला.
thakre-jadhav.
thakre-jadhav.

औरंगाबादः गंगापूर तालुका अनेक वर्षांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे, यावेळी हक्काच्या गंगापूरात भगवा मागे कसा पडला ? गंगापुरकरांचे शिवसेनेवरील प्रेम आटले का? अशा शब्दात शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवाबद्दल खंत व्यक्त केली.

 तुमच्या बद्दल तक्रार नाही, पण तुम्ही कुणाच्या पाठीशी उभे राहिलात, उल्लू कसे बनलात असे म्हणत अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना सर्वाधिक मताधिक्‍य मिळवून देणाऱ्या गंगापूरकारांबद्दलची नाराजी ठाकरे यांनी जाहीरपणे व्यक्त केली. 

शिवसेनेच्या वतीने राज्यभरात सुरू करण्यात येणाऱ्या पीक विमा मदत केंद्राअंतर्गत गंगापूर तालुक्‍यातील लासूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथील पीक विमा केंद्राला उध्दव ठाकरे यांनी आज भेट दिली.

 यावेळी आयोजित मेळाव्यात बोलतांना सुरूवातीलाच ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत गंगापूर मधून अपक्ष हर्षवर्धन जाधव यांना 64 हजार मत  मिळाल्याच्या मुद्याला हात घातला. 
उध्दव ठाकरे म्हणाले, गंगापूरची जनता कायम शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला अशी ओळख असतांना यावेळी असे काय घडले, की तुमचे शिवसेनेवरील प्रेम आटले? माझी तुमच्या बद्दल नाराजी नाही, पण आकडेवारीसह तुम्हाला सांगू का? तुम्ही कुणाच्या पाठीशी उभे राहिलात, कुणाच्या सांगण्यावरून उल्लू बनलात. मला अजूनही विश्‍वास बसत नाही की, आपल्या हक्काच्या गंगापूरमध्ये भगवा मागे पडला? 

आज प्रशांत बंब आमच्या सोबत आहेत , पण विधानसभा निवडणुकीत त्यावेळी देखील तुम्ही भगव्याची साथ सोडली होती, असे सांगत उध्दव ठाकरे यांनी अंबादास दानवे यांच्या गंगापूर-खुल्ताबाद विधानसभा निवडणुकीतील पराभवाची आठवण देखील उपस्थितांना करून दिली. निवडणुका येतात जातात, पण नात कायम टिकलं पाहिजे ,असे आवाहनही शेवटी उध्दव ठाकरे यांनी केले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com