विमा कंपन्यांनो ,शेतकऱ्यांना नडाल तर तुमचे दुकान बंद करीन : उध्दव ठाकरे

तुमची मुंबईत कार्यालय आहेत हे लक्षात ठेवा, शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर ही दुकान बंद करू. -उध्दव ठाकरे
udhav_thakare.
udhav_thakare.

औरंगाबादः "लोकसभा निवडणुकीच्या पंढरपूर येथील जाहीर सभेत मी पीक विमा घोटाळ्याची शक्‍यता वर्तवली होती. आज शेतकऱ्यांचे हजारो कोटी रुपये घेऊन पीक विमा कंपन्या पळाल्या आहेत, त्यांचे कार्यालय नाहीत की, कुणी प्रतिनिधीही भेटत नाही अशी परिस्थीती आहे. पण शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळाल, त्यांना नडाल तर  गाठ शिवसेनेशी आहे."

"तुमची मुंबईत कार्यालय आहेत हे लक्षात ठेवा, शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर ही दुकान बंद करू ,"असा गर्भित इशारा शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी दिला. 

गंगापूर तालुक्‍यातील लासूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथील शिवसेना पीक विमा मदत केंद्रला भेट दिल्यानंतर शेतकऱ्यांशी संवाद साधतांना उध्दव ठाकरे बोलत होते. शेतकऱ्याचे कर्जमाफ झाले, कुणाला प्रमाणपत्र मिळाले असा सवाल करत त्यांनी कर्जमाफी आणि पीक विम्यातील गलथान कारभाराच्या मुद्याला हात घातला.

 उध्दव ठाकरे म्हणाले, सरकारच्या योजना चांगल्या आहेत. मुख्यमंत्र्यांशी आमची मैत्री देखील आहे. पण आम्ही कर्जमाफी नाही तर सरसकट कर्जमुक्तीची मागणी केली होती. 

दीड लाखापर्यंतचे कर्जमाफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला. शेवटी आर्थिक बाबी देखील तपासून बघाव्या लागतात, त्यातून मधला मार्ग काढून दिलेली कर्जमाफी देखील कमी नाही. विरोधक आमच्यावर नेहमी टिका करतात, तुम्ही सत्तेत असून विरोध कसा करता विचारतात? 

पण आम्ही सत्तेत आहोत ते तुमच्यासाठी. तुम्ही दिलेल्या आर्शिवादामुळेच आम्हाला शक्ती मिळते आणि तिचा वापर तुमच्यासाठीच करतो. शिवसेनेचा जन्मच मुळात तुमची सेवा करण्यासाठी झालेला आहे. 

त्यामुळे पीक विमा मदत केंद्रातून भरून घेतले जाणारे अर्ज मी स्वःता मुख्यमंत्र्यांकडे घेऊन जाणार आहे. वेळ पडली तरी शेतकऱ्यांनाही मुख्यमंत्र्याकडे घेऊन जाईल आणि तुम्हाला न्याय मिळवून देईन असा शब्द उध्दव ठाकरे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com