पाच वर्ष सत्तेत राहून आता उध्दव म्हणतात , असली युती काय कामाची  ?  

राज्यातील 90 लाख शेतकऱ्यांना कोणी अपात्र ठरवले. त्यासाठी काय निकष लावले हे तपासण्याची गरज आहे. जर कंपनी विमा देत नसेल तर त्यांना शिक्षा झालीच पाहिजे.
uddhav_thakre.
uddhav_thakre.

मुंबई:   जर शेतक-यांना न्याय मिळणार नसेल तर सत्ता व युती काय कामाची, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज येथे केला आहे. जागावाटपाची चर्चा केंव्हा सुरु होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना उद्धव ठाकरे यांनी पुन्हा युतीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे . 

भाजपने सुरु केलेल्या मेगाभरतीचा या विसंवादी सुरांशी काही संबंध आहे काय याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा आहे . 

दरम्यान मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव म्हणाले की,शिवसेनेने पीक विम्याचा प्रश्न हाती घेतल्यानंतर 10 लाख शेतकऱ्यांना 960कोटी रूपयांची नुकसानभरपाई मिळाली असली तरी अजूनही 90 लाख शेतकरी विमा कंपन्यांनी अपात्र ठरवले आहेत. त्यांना विम्याचा लाभ मिळायलाच हवा. नफा कमावण्यासाठी विमा कंपन्या नाहीत. एक रूपयाचीही गुंतवणूक या कंपन्याची नसताना नफा कशासाठी ? 2000 कोटी रुपये शेतकऱ्यांना देणे होते ते पैसे कंपन्यांकडे अजून पडून आहेत.  

ही रक्कम शेतकऱ्यांची आहे. प्रधान मंत्री विमा योजनेसाठी 2 टक्के रक्कम शेतकरी भारतात तर सरकार 98 टक्के रक्कम भरत असते. शिवसेनेकडे या योजनेबद्दल बद्दल तक्रारी आल्या आहेत. नुकसान भरपाई शेतकर्यांना दिली जात नाही. सध्या महाराष्टात पूर संकट आहे. मराठवाड्यात दुष्काळ आहे. वाशीम जिल्यात एक महिला शेतकरी सोनाली राठोड याना दोन एकर ला 102 रुपये भरपाई मिळाली त्यांनी 1800 रुपयांचा विमा काढला होता. अश्‍या प्रकारे हा घोटाळा सुरू आहे.

म्हणून शेतकऱ्यांना शिवसेना ही नुकसान भरपाई मिळून देणारच म्हणजे देणारच, असा ठाम विश्‍वास उद्धव यांनी यावेळी व्यक्‍त केला.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com