अजित पवारांसारखे धरण भरण्यापेक्षा, स्वयंपाक केलेला बरा : उध्दव ठाकरे

..
Thakare in Osmanabad
Thakare in Osmanabad

परंडा :  खाजगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात लूट झाली, शिवसेनेने आवाज उठवल्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांना अकराशे कोटी रुपये पीकविम्या पोटी मिळाले. पण यापुढे खाजगी पीक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी सरकारची विमा कंपनी स्थापन करणार असल्याचे शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी सांगितले. विरोधकांनी शेतकऱ्यांच्या सुखा आड येऊ नये असा टोला देखील त्यांनी लगावला.

परंडा विधानसभा मतदारसंघातील शिवसेना- भाजपा महायुतीचे उमेदवार प्रा. तानाजी सावंत यांच्या प्रचारार्थ सोमवारी परंडा येथे उध्दव ठाकरे यांची सभा झाली. यावेळी त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला. 


ठाकरे म्हणाले, शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावरून टिका करणाऱ्या शरद पवारांनी योग्य वेळी मदत केली असती तर राज्याचे हाल झाले नसते. पण त्यांना सरकार पाडण्यातच अधिक रस वाटतो, त्यांच्याकडे सरकार पाडण्याचा अनुभव आहे. पवार अनेकवेळा मुख्यमंत्री झाले. त्यांच्या राजकारणाची सुरवातच वसंतदादाचे सरकार पाडून झाली.

शिवसेनेच्या दहा रुपयात जेवणाची थाळी देण्याच्या योजनेवर शरद पवारांनी केलेल्या टिकेचा संदर्भ देत "अजित पवारांसारखे धरण भरण्यापेक्षा, स्वयंपाक केलेला बरा, अशा शब्दांत ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले. प्रत्येक ठिकाणी प्रचारात पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांचे फोटो दिसत असले तरी पाच वर्षांत झालेल्या विकासात शिवसेनेचाही वाटा असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. सरकारमध्ये असलो तरी चुकीचे वाटल्यास बोलतच राहणार असल्याचेही ते म्हणाले. 

मागील काही दिवसांपासून प्रचार सभांतून पवार-मुख्यमंत्री यांच्यातील आरोप-प्रत्यारोप आणि त्यातून केले गेलेले हातवारे यावरून उध्दव ठाकरे यांनी विरोधकांना टोला लगावतांना निवडणूक तमाशातली बतावणी नाही, असे स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com