धीर सोडू नका, मी तुमच्या पाठीशी : उद्धव ठाकरे

..
uddhav_thakre
uddhav_thakre

कडेगाव/ विटा   : अतिवृष्टी व परतीच्या पावसाने सर्वत्र शेती पिकांची मोठे नुकसान झाले आहे. तेव्हा शेतकऱ्यांना पिकवार नुकसान भरपाई मिळायला हवी ती आम्ही मिळवून देऊ. त्यासाठी राज्यभरात शेतकरी मदत केंद्रे उभा केली जातील. मात्र शेतकऱ्यांनी धीर सोडू नये, खचून जाऊ नये. आम्ही ठामपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा आहोत. मी तुम्हाला धीर द्यायला आलो आहे. असा दिलासा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे शेतकऱ्यांना दिला.


शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगली व सातारा जिल्ह्यात आज ओला दुष्काळ पाहणी दौरा केला. त्यावेळी त्यांनी सांगली जिल्ह्यातील विटा, व कडेगाव तालुक्‍यातील नेवरी येथे आनंदा किसन शिंदे या शेतकऱ्याच्या नुकसानग्रस्त टोमॅटोच्या प्लॉटची पाहणी केली व त्यांना दिलासा दिला.तसेच मदतीचेही आश्वासन दिले.


उध्दव ठाकरे म्हणाले, सांगली जिल्ह्यातही पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याची भरपाई मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहोत. संकटसमयी शेतकऱ्यांना मदत मिळणे गरजेचे आहे. त्यासाठीच माझी धडपड आहे.परंतु शेतकऱ्यांनी धीर सोडू नये.खचूनही जावू नये.शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी आलो आहे.शेतकऱ्यांना पिकवार नुकसानीची भरपाई मिळाली पाहिजे.त्यासाठी आमचा प्रयत्न आहे.


आमदार डॉ.विश्वजित कदम म्हणाले, कडेगाव तालुक्‍यात अतिवृष्टी व परतीच्या पावसाने पिकांचे न भूतो असे नुकसान झाले आहे.विशेषतः डाळींब तसेच द्राक्ष बागांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे.तेव्हा शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी.


यावेळी खासदार विनायक राऊत, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, मिलिंद नार्वेकर, शिवसेना संपर्क प्रमुख नितीन बानुगडे-पाटील, आमदार मोहनराव कदम, आमदार डॉ. विश्वजित कदम, आमदार अनिल बाबर, माजी मंत्री विजय शिवतारे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभूते, आनंदराव पवार, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष मोहिते, सुनील मोहिते, अनिल देसाई, इंद्रजित साळुंखे, महेश कदम, उपजिल्हाधिकारी डॉ.विजय देशमुख, प्रांताधिकारी गणेश मरकड, तहसीलदार डॉ. शैलजा पाटील, तालुका कृषी अधिकारी बी.जी.कदम आदी मान्यवर व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com