udhhav thackrey on udyanrajes criticizm | Sarkarnama

उदयनराजे मोदींना पेढेवाले म्हणाले होते; ती टीका कशी चालली?

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019

उदयनराजे यांनी राष्ट्रवादीत असताना नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना पेढेवाल्याशी तुलना केली होती.

पुणे: साताऱ्याची जागा शिवसेनेच्या वाट्याची होती. त्या जागेवर उदयनराजे भोसले भाजपकडून कसे उभा राहिले? नरेंद्र मोदी यांना उदयनराजेंनी पगडी घातली पण त्याअगोदर ते मोदींबद्दल काय बोलत होते? कोणते पेढे त्यांनी मोदींना दिले?"असा प्रश्न शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विचारला.

थोड्या वेळापूर्वी मुंबईत काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेनेवर टीका केली होती. शिवसेना नरेंद्र मोदी यांच्यावर करत असलेली टीका खेदजनक असल्याचे फडणवीस यांनी म्हटले होते. त्याला पत्रकार परिषद घेवून ठाकरे यांनी प्रतिउत्तर दिले.

"साताऱ्याची जागा आमची होती. तिथे उदयनराजे भाजपकडून कसे उमेदवार झाले?असा सवाल करत ठाकरे म्हणाले,"ज्यांनी नरेंद्र मोदी, अमित शहा यांना पगडी घातली ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल काय बोलत होते. त्यांनी कोणते पेढे मोदींना दिले?शिवसेना कधीही मोदी यांच्याबद्दल वाईट बोललेली नाही. माझं आणि मोदी यांचे नाते भावभावाचे आहे."असे ठाकरे म्हणाले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख