उद्धव ठाकरे उद्या सातारा दौऱ्यावर

फलटण तालुक्‍यातील फलटण आणि तरडगाव येथील नुकसानीची पहाणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधतील.
उद्धव ठाकरे उद्या सातारा दौऱ्यावर

सातारा : अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पहाणी करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. येत्या शुक्रवारी दुपारी दोन वाजता त्यांचे सांगलीतून मायणीमार्गे जिल्ह्यात आगमन होईल.

जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. पंचनामे पूर्ण होत आले तरी शासनाकडून अद्याप भरपाईबाबत कोणतीही हालचाल नाही. मात्र, झालेल्या नुकसानीची पहाणी करून शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख सातारा जिल्ह्यात येणार आहेत. 

शुक्रवारी (ता. 15) दुपारी दोन वाजता सांगलीमार्गे खटाव तालुक्‍यात येणार आहेत. खटाव तालुक्‍यातील कातरखटाव, वडुज, पुसेगाव येथील पहाणी केल्यानंतर ते ताथवडा घाटातून फलटणला जातील. फलटण तालुक्‍यातील फलटण आणि तरडगाव येथील नुकसानीची पहाणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधतील. सायंकाळी लोणंदमार्गे पुण्याकडे रवाना होणार आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com