पुणे: आमचा रंग आणि अंतरंगही भगवं आहे. आम्ही कधीही भगवा खाली ठेवणार नाही, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
मुंबई येथील बीकेसी मैदानावर झालेल्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. ठाकरे म्हणाले, निवडणूक निकालानंतर मला खोटे पाडण्याचा प्रयत्न केला गेला. बाळासाहेबांच्या खोलीत देण्यात आलेला शब्द फिरवण्यात आला. त्यामुळे मला वेगळा निर्णय घ्यावा लागला. मी विरोधकांशी जाहीरपणे हातमिळवणी केली. पण आम्ही भगवा खाली ठेवलेला नाही. आमचा रंग आणि अंतरंगही भगवं आहे. मी रंग बदलणार नाही. ठाकरे कुटुंब कधीही गद्दारी करणार नाही.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.