बाळासाहेब थोरात बाजीप्रभू होऊ शकत नाहीत!

शेतकऱ्यांना कर्जमाफी केली, परंतू या कर्जमाफीवर आपण समाधानी नाही. त्यांची कर्जमुक्ती झाली पाहिजे, दरवर्षी किमान दहा हजार रुपये त्यांना कसे मिळतील, अशी आपल्याकडे योजना आहे. तीस युनीटपर्यंत घरगुती वीजबील कपात करण्याचा प्रयत्न आहे. - उद्धव ठाकरे
बाळासाहेब थोरात बाजीप्रभू होऊ शकत नाहीत!

श्रीरामपूर (नगर) : बाळासाहेब थोरात बाजीप्रभू होऊच शकत नाहीत. त्यांच्या आसपासही जावू शकत नाही. शिवरायांसाठी त्यांनी आपले बलिदान दिले. इथे तर त्यांचा नेताच बॅंकाकला पळून गेला, तर तुम्हा काय लढणार, असा टोला शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज विरोधकांना लगावला.

विधानसभा निवडणुकीनिमित्त शिवसेनेचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचाराचा प्रारंभ आज मतदार जनाबाई तुपे यांच्या हस्ते तसेच ठाकरे यांच्या उपस्थितीत झाला. त्यावेळी झालेल्या जाहिर सभेत ते बोलत होते. गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, सुजय विखे, कांबळे, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी आमदार भानुदास मुरकुटे, चंद्रशेखर कदम, मिलिंद नार्वेकर, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे या वेळी उपस्थित होते.

युतीचा मधला काळ थोडा खट्टा मीठ्ठा होता. युती होती पण व नव्हती पण. आता एका विचाराने आम्ही एकत्र आलो आहोत, असे सांगून ठाकरे म्हणाले, काँग्रेस राष्ट्रवादीने इतके दिवस मृगजळ दाखविले. लोकांना झुलवत ठेवले. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत त्यांची काय अवस्था झाली. निवडणुकीसाठी त्यांना स्थानिक उमेदवार मिळाला नाही. तुमच्यात दम नाही, आम्ही ती हिम्मत दाखविली. कांबळे यांना उमेदवारी दिली. विखे, मुरकुटे त्यांच्यासोबत असल्याने मला चिंता नाही. सुशिलकुमार शिंदे कधी खोटे बोलत नाहीत. आम्ही थकल्याची कबुली त्यांनी दिली. निवडणुकीत एकत्र येण्यापुरते तरी त्यांचे संख्याबळ होईल की नाही, अशी शंका आहे. निवडणुकीनंतर या दोन्ही पक्षातील उर्वरित नेतेही युतीत सामील होतील, अशी शक्यता त्यांनी वर्तविली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com