udhhav thackrey appoint new dist president in satara | Sarkarnama

उद्धव ठाकरे यांनी सातारा जिल्हाप्रमुखांना हटवले

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 19 डिसेंबर 2018

संघटनेतील मरगळ झटकण्यासाठी थोडे वर खाली करावे लागते

- नितीन बानुगडे पाटील

सातारा : शिवसेनेतंर्गत पदाधिकारी व आमदारातील धुसफूसीतून सातारा, कऱ्हाड व पाटणचे जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांना पदावरून दूर करण्यात आले आहे. त्यांच्या जागी पाटण व कऱ्हाड तालुक्‍यांसाठी जयवंत शेलार यांची जिल्हा प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे. 

आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील शिवसेनेचे 12 पदाधिकारी बदलले आहेत. 

आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेत पदाधिकाऱ्यांची बदलाबदल केली आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील 12 तर सांगली जिल्ह्यातील 27 पदाधिकारी बदलले आहेत. सातारा, कऱ्हाड व पाटणचे जिल्हा प्रमुख हर्षद कदम यांना पदावरून दूर करण्यात आले आहे. आमदार व पदाधिकारी वादातून हा प्रकार झाल्याची चर्चा शिवसेना कार्यकर्त्यांतून बोलली जात आहे. आता नव्या जबाबदारीमध्ये कऱ्हाड व पाटण तालुक्‍याची जबाबदारी जिल्हा प्रमुख जयवंत शेलार यांच्याकडे दिली आहे. तर सातारा, वाई आणि कोरेगावची जबाबदारी जिल्हा प्रमुख राजेश कुंभारदरे यांच्याकडे सोपविली आहे. तर तिसरे जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव यांच्याकडे माण, खटावची जबाबदारी कायम ठेवली आहे. 

या पदाधिकारी बदलाबाबत कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व शिवसेनेचे संपर्क प्रमुख नितीन बानुगडे पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, आगामी निवडणुकीच्या तोंडावर हे पदाधिकारी बदलले आहेत. शिवसेना सर्व निवडणुका स्वबळावर लढणार आहे. त्याची तयारी सुरू असताना बेरजेचे राजकारण महत्वाचे आहे. संघटनेतील मरगळ झटकण्यासाठी थोडे वर खाली करावे लागते.  

सांगलीतील 27 तर साताऱ्यातील 12 पदाधिकाऱ्यांना बदलण्यात आले आहे. हे फेरबदल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार झाले आहेत. आगामी निवडणुकीसाठी रणनिती ठरविण्यासाठी हे फेरबदल आहेत.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख