udhava thakare | Sarkarnama

शेतकऱ्यांची सरकारने पटकन दखल घ्यावी - उद्धव ठाकरे

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 25 एप्रिल 2017

मुंबई : शेतकरी परिस्थितीचा शिकार बनत आलेला आहे. शेतकरी रस्त्यावर उतरले तेव्हाच पटकन दखल सरकारने घेतली पाहिजे. शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरण्याची गरज लागणार नाही असा कारभार केला पाहिजे, मला तशी अपेक्षा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. मातोश्री या आपल्या निवासस्थानी ते पत्रकारांशी बोलत होते.

मुंबई : शेतकरी परिस्थितीचा शिकार बनत आलेला आहे. शेतकरी रस्त्यावर उतरले तेव्हाच पटकन दखल सरकारने घेतली पाहिजे. शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरण्याची गरज लागणार नाही असा कारभार केला पाहिजे, मला तशी अपेक्षा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. मातोश्री या आपल्या निवासस्थानी ते पत्रकारांशी बोलत होते.

ठाकरे पुढे म्हणाले, शिवसेनेची मागणी आहे. शेतकऱ्यांना एकदा तरी पूर्णपणे कर्जमुक्त केले पाहिजे. तूर उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न इतका ताणला जाण्याची गरज नव्हती. मंत्रिमंडळ बैठकीच्या आधी आमच्या मंत्र्यांनी आक्रमक पवित्रा घेतला, आणि तूर खरेदी करण्याचा निर्णय घ्यायला भाग पाडले असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. यावेळी शिवसेनेने हा पवित्रा शेतकऱ्यांसाठी घेतला असून मुख्यमंत्र्यांनी याला प्रतिसाद दिला. त्याबद्दल ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना धन्यवादही दिले. 

ठाकरे पुढे म्हणाले, "आत्महत्याग्रस्त जिल्ह्यासाठी मदत द्या, अशी बातमी वाचली, एखादा जिल्हा आत्महत्याग्रस्त होईपर्यंत वाट न पाहता शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येऊ देऊ नये', शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्यासारखी परिस्थिती असल्याचे सांगत ते म्हणाले शिवसेना शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. शिवसेना ठामपणे शेतकऱ्यांच्या मागे उभी असल्याचे दावा ही ठाकरे यांनी केला. 

समान कर असेल तर समान दर हवे 
जागतिक बाजारपेठेत पेट्रोल, डिझेल भाव खाली आले तरी आपल्या देशात दर खाली आले नाहीत. जर समान कर लावणार असू तर देशभरात दर पण समान असायला हवा अशी अपेक्षा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. ते पुढे म्हणाले, इतर राज्यात राज्य सरकारे आपल्या सोयीने दर लावतात. त्यामुळे दरवाढ होते. समान कर असेल तर दर पण समान असले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मुंबईत सगळ्यात जास्त दराने पेट्रोल विकले जात असेल तर ते चूक असल्याचे मतही उद्धव ठाकरे यांनी नोंदवले.

नोटबंदीवरून आपल्या भूमिकेवरून भाजपला चिमटा काढत ठाकरे म्हणाले, काश्‍मीर शांत होत नाही, छत्तीसगढमध्ये हल्ला झाला. गोवंश हत्याबंदी कायदा काही राज्यात झाला, काही राज्यात होत नाही त्यामुळे त्याचा परिणाम होत नाही असं बोलले जाते. मग काश्‍मीर, छत्तीसगडमध्येही नोटबंदी झाली नसेल कदाचित असा टोलाही ठाकरे यांनी लगावला. यावेळी नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाबाबत काही बोलण्याचा नकार देत ठाकरे यांनी भाजप व राणे या दोघांनाही शुभेच्छा दिला. 

"मातोश्री' निवासस्थानी कॉंग्रेसच्या नेत्या व मीरा भाईंदर महापालिकेच्या माजी महापौर निर्मला सावळे त्यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विद्यमान नगरसेवक कमलेश भोईर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. निर्मला सावळे यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विद्यमान नगरसेवक कमलेश भोईर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना शिवबंधन बांधून त्यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख