उद्धव ठाकरे यांनी विश्वास जिंकला. 

उद्धव ठाकरे यांनी  विश्वास जिंकला. 

पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला असून भाजपने आजच्या विश्वासदर्शक ठरावासाठी बोलविलेल्या बैठकीवर बहिष्कार टाकला. आजचे अधिवेशन हे कायद्याला धरून नाही अशी भूमिका माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. 

फडणवीस यांनी सभागृहाबाहेर येऊन ठाकरे सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. सभागृहात कामकाजाला सुरवात होताच फडणवीस उभे राहिले आणि शिवतिर्थावर मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी घेतलेल्या शपथविधी घटनेला धरून नव्हते. बऱ्याच गोंधळानंतर भाजपने सभात्याग केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मतदानाला सुरवात झाली.

शिवसेनेने 169 मतांनी ठराव जिंकला. विरोधक नसल्याने मुख्यमंत्री ठाकरेवरील विश्वास जिंकले. चार जण तटस्थ राहिले. मनसे आणि एमआयएचा संबंध आहे. विश्वास दर्शक ठराव संमत झाल्याची घोषणा विधानसभेचे हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी केली.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com