आजचा वाढदिवस ः उद्धव ठाकरे; शिवसेना पक्षप्रमुख.  - udhav thckray birthday | Politics Marathi News - Sarkarnama

 आजचा वाढदिवस ः उद्धव ठाकरे; शिवसेना पक्षप्रमुख. 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 27 जुलै 2018

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा लाभलेले उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत. बाळासाहेब; बाळासाहेब होते तो मी नाही हे जाहीरपणे मान्य करणाऱ्या उद्धव यांनी आपल्या शांत आणि संयमी स्वभावाने पक्षावर पकड बसविली.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा लाभलेले उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत. बाळासाहेब; बाळासाहेब होते तो मी नाही हे जाहीरपणे मान्य करणाऱ्या उद्धव यांनी आपल्या शांत आणि संयमी स्वभावाने पक्षावर पकड बसविली.

राजकारणात अनेक चढउतार येत असतात. अनेक कटू प्रसंग येतात. जयपराजय स्वीकारावे लागतात. उद्धव यांनीही नेहमीच यशापेक्षाही पराजय मोठ्या हिमतीने स्वीकारले. भाजप सारख्या बलाढ्य अशा पक्षाशी दोन हात करण्यासही त्यांनी मागेपुढे नाही. ठाकरे घराण्याचा वारसा लाभलेला असतानाही त्यांनी आपल्या कर्तृत्वाने केवळ शिवसेनेतच नव्हे तर इतर पक्षातील नेत्यांची मने जिंकली आहेत. शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांप्रमाणेच त्यांच्यावर भरभरून प्रेम केले.

निवडणूक कोणतीही असो ते मोठ्या ताकदीने मैदानात उतरताना दिसतात. विधानसभा, विधानपरिषद, लोकसभेची निवडणूक असो की स्थानिक स्वराज संस्थेची. शिवसेनेला यश मिळाले नाही असे कधी होत नाही त्याचे श्रेय निश्‍चितपणे उद्धव ठाकरेंना जातेच. आज शिवसेनेच 63 आमदार आणि अठरा खासदार आहेत. शिवाय मुंबई पालिकेबरोबर इतर ठिकाणीही सत्ता आहे. ग्रामपंचायत ते लोकसभेपर्यंत शिवसेना नाही असे दिसत नाही.

मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आजही ते आणि त्यांची शिवसेना नेहमीच सर्वांपेक्षा दोन पाऊले पुढे असते. जुन्या जाणत्या नेत्यांबरोबरच तरूण कार्यकर्त्यांच्या खांद्यावर जबाबदारी टाकतानाच शिवसेना तळागाळात पोहविण्यासाठी ते नेहमीच दक्ष असतात. ठाकरे घराण्यातील तिसरी पिढीही राजकारणात सक्रिय झाली आहे. उद्धव यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची घौडदौड महाराष्ट्रात सुरू आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख