udhav thakrey reaches at bjp head quarter | Sarkarnama

उद्धव ठाकरेंनी मोदी, शहांसोबत जागविल्या अटलजींच्या आठवणी; सेना प्रमुख भाजप मुख्यालयात

मृणालिनी नानिवडेकर
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

मुंबई : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर शोकाकुल भाजप नेत्यांसमवेत शिवसेनेचे सर्व खासदार आणि ठाकरे कुटुंबिय मध्यरात्रीपर्यंत वाजपेयींच्या निवासस्थानी काल हजर होते. वाजपेयींच्या अंत्यदर्शनासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उदधव ठाकरे संपूर्ण कुटुंबासह पुन्हा एकदा थेट भाजप मुख्यालयात आज दाखल  झाले.

 वाजपेयी यांच्या निधनाचे वृत्त समजताच काल सायंकाळी उद्धव,.रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे दिल्लीला रवाना झाले. त्यांनतर लगेचच रात्रीच्या विमानाने तेजस ठाकरे यांनीही दिल्ली गाठली. रात्री वाजपेयी यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी ,भाजपचे अध्यक्ष अमित शहा गृहमंत्री राजनाथ सिंह खुर्च्या टाकून दिवंगत नेत्याच्या आठवणी काढत बसले होते. उदधवजीही त्यात सामील झाले.

मोदीजी या वेळी  म्हणाले की अटलजींच्या ओजस्वी काव्याचे अनेक अर्थ निघतात. त्या राष्ट्रकार्याला प्रेरणा देतात. अमित शहा यांनी उदधवजींशी बोलताना अटलजींबददलच्या आठवणींना उजाळा दिला. दिल्लीत चंद्रकांत खैरे हे औरंगाबादचे खासदार उपस्थित होते.तेही या गप्पांमध्ये सहभागी झाले. खात्याशी संबंधित कामासाठी अनंत गीते हे शिवसेनेचे केंद्रीय मंत्रिमंडळातील एकमेव मंत्री बाहेरगावी होते. उद्धवजींनी त्यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांना निरोप देवून त्यांना बोलावून घेतले.

सर्व शिवसेना खासदारांसह ठाकरे कुटुंबिय भाजप मुख्यालयात आज हजर होते.. भाजपवर कायम टीका करणारे `सामना` या मुखपत्राचे संपादक खासदार संजय राउत यांनीही वाजपेयींना श्रध्दांजली अर्पण करताना भावनांचा ओलावा प्रगट केला. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख