udhav thakray interview | Sarkarnama

भाजपने युती तोडली, ती शिवसेना तोडण्याच्या इराद्याने, उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 23 जुलै 2018

मुंबई : 2014 मध्ये भाजपने युती तोडली,शिवसेना तोडण्याच्या इराद्याने युती तोडली आणि तरीही शिवसेनेने टक्कर दिली. बाळासाहेब हीच माझी प्रेरणा आहे. ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे हीच निती माझ्या रक्तात भिनली असल्याचे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. 

मुंबई : 2014 मध्ये भाजपने युती तोडली,शिवसेना तोडण्याच्या इराद्याने युती तोडली आणि तरीही शिवसेनेने टक्कर दिली. बाळासाहेब हीच माझी प्रेरणा आहे. ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे हीच निती माझ्या रक्तात भिनली असल्याचे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. 

काही काही वेळेला पटकन कळत नाही. कधी चक्रीवादळ येते. ते येऊन गेले की ते विध्वंसक करून जाते हे लक्षात येते. महाराष्ट्रात सह्याद्रीचे वारे वाहते त्यामुळे येथे विध्वंसक कधीच होत नाही अशी भूमिकाउद्धव ठाकरे यांनी आज मांडली. ते म्हणाले, "" मी कधीच गुरू होऊ शकत नाही. आईवडील आणि गुरू प्रत्येकालाच असावा लागतो. मी जे काही निर्णय घेतो ही बाळासाहेबांची प्रेरणा आहे. ही टक्कर देण्याची हिम्मत देते कोण मला ? ही ऊर्मी येते कोठून?ही प्रेरणा आली कुठून ? आणि ती आल्यानंतर तमाम शिवसैनिक आणि मराठी माणूस हा माझ्यामागे, माझ्यासोबत एकवटऊन उभा राहिता कसा ? हे काही माझे कर्तृत्व नाही.'' 

शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची आज मुलाखत (उद्धव ठाकरे अनकट) घेतली. या मुलाखतीत राऊत यांनी विविध मुद्यावर बोलते केले. यावेळी बोलताना उद्धव म्हणाले, "" वारे कोणत्या दिशेने वाहतात हे काही वेळेला पटकण काही वेळेला कळत नाही. एक प्रकार असतो ज्याला चक्रीवादळ म्हणतात. जे गोल गोल फिरत जाते. त्यामुळे ते नेमक्‍या कोणत्या दिशेने चाललंय ह कळत नाही. पण, ते येऊन गेल्यानंतर कळतं की , सगळा विध्वंस झाला आहे.'' 

अर्थात महाराष्ट्राचे वारे हे सह्याद्रीचे वारे आहे. त्यामुळे येथे विध्वंसक वारे कदापि वाहू शकणार नाहीत. कधीच वाहू शकणार नाहीत. कारण महाराष्ट्राने नेहमी देशाला दिशा दिली आहे आणि त्याच्यात नेमके जसं आपण म्हणतो, ना तव तेजाचा एक अंश दे वैगैरे. तर तो अंश जरी घेण्याचा प्रयत्न केला तरी महाराष्ट्र एका योग्य दिशेने जाऊ शकतो असेही ते म्हणाले 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख