वेडा झालेला विकास देशाला परवडेल का ? - उद्धव ठाकरे 

वेडा झालेला विकास देशाला परवडेल का ? - उद्धव ठाकरे 

मुंबई : वेडा झालेला विकास राज्याला आणि देशाला परवडेल का ? आमची मने अजून जिवंत आहेत. मुर्दाड मनाने आम्ही कारभार करु शकत नाही. माझे मंत्री देखील झोपत नाही. माता भगिनींची झोप उडवून तुम्ही तुमची स्वप्न साकारायला दौरे करतात. वेडा झालेला विकास राज्याला आणि देशाला परवडेल का ? 
असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे. 

अंगणवाडीसेविकांचे पगारवाढीसह इतर मागण्यासाठी सध्या आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन सुरु आहे. त्या आंदोलनाला पाठिंबा देताना उद्धव ठाकरे बोलत होते. 
ठाकरे म्हणाले, "" मी इथे नेतृत्त्व करायाला नाही, तर नेतृत्वाला ताकद द्यायला आलो आहे. तुम्ही आई बनून कुपोषित बालकांचं पालन पोषण करता. ज्या मातांचे आशीर्वाद घ्यायला पाहिजे, त्या मातांचे शाप लागल्याशिवाय राहणार नाही. खचून जाऊ नका, सरकारला नमवण्याची ताकद तुमच्यात आहे. अंगणवाडीसेविका ज्या दिशा ठरवतील त्यामध्ये शिवसेना सहभागी असेल.'' 

ते पुढे म्हणाले, की मुख्यमंत्रीसाहेब इकडे प्रतिष्ठेचा प्रश्न करू नका, इकडे लाडू द्या नाहीतर चिक्की द्या. लोकशाहीच्या नावाने जर तुम्ही ठोकशाही करणार असाल, तर हे मी चालू देणार नाही. 

"" आमची मनं अजून जिवंत आहेत. मुर्दाड मनाने आम्ही कारभार करु शकत नसल्याचे सांगत या आंदोलनाला शिवसेनेचा पाठिंबा जाहिर केला. यावेळी उद्धव ठाकरेंनीही सरकारवर जोरदार टीका केली. निवडणूक आल्यानंतर तुम्हाला शिवरायाची आठवण येते. त्या शिवाजी महाराज्यांच्या या मातांचे आशिर्वाद घ्यायला पाहिजे, त्या मातांचे सरकारला शाप लागल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीका केला. 

शिवसेना प्रमुखांच्या पाठींब्याने उत्साह वाढलेल्या अंगणावाडी सेविकांनी आपल्यां मागण्यासंदर्भात जोरदार घोषणाबाजी केली. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समिती आक्रमक होत मुख्यमंत्री आणि पंकजा मुंडे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. आठ दिवसात मागण्यांची पूर्तता न केल्यास मंत्रालयात घुसू असा इशाराही आंदोलकांनी दिला.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com