udhav thakray | Sarkarnama

हिंसाचारामुळे देश अराजकतेच्या खाईत, शिवसेनेची टीका

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 27 एप्रिल 2017

पुणे : सुकमामधील नक्षली हल्ल्यानंतर पाचशे आणि हजारच्या नोटांमुळे दहशतवाद वाढला होता या भूलथापा उघड्या पडल्या अशी टीका शिवसेनेने केली आहे. हिंसाचारामुळे देश अराजकतेच्या खाईत ढकलला जात आहे असे जोरदार टीकास्त्र शिवसेनेने भाजपवर सोडले आहे. 

पुणे : सुकमामधील नक्षली हल्ल्यानंतर पाचशे आणि हजारच्या नोटांमुळे दहशतवाद वाढला होता या भूलथापा उघड्या पडल्या अशी टीका शिवसेनेने केली आहे. हिंसाचारामुळे देश अराजकतेच्या खाईत ढकलला जात आहे असे जोरदार टीकास्त्र शिवसेनेने भाजपवर सोडले आहे. 

मोदी सरकारला दररोज लक्ष्य करण्याचे काम शिवसेनेने सुरूच ठेवले असून टीका करण्याची एकही संधी सोडली जात नाही. छत्तीसगडमधील सुकमा येथे नक्षलवाद्यांनी केंद्रीय राखीव दलाच्या (सीआरपीएस) तुकडीवर हल्ला केला होता. या हल्ल्यात जवान हुतात्मा झाले. शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून मोदी सरकारला सुकमा हल्ल्यावरुन खडे बोल सुनावले आहेत. नोटाबंदीच्या निर्णयानंतर दहशतवाद संपुष्टात येईल या थोतांडाची सालपटं निघाली आहेत. हजार आणि पाचशेच्या नोटांमुळे काळा पैसा आणि दहशतवाद वाढल्याच्या भूलथापाही यानिमित्ताने उघड्या पडल्या असे शिवसेनेने म्हटले आहे. नोटाबंदीमुळे नक्षलवाद्यांची आर्थिक रसद बंद होऊन हल्ले थांबतील असा दावा मोदी सरकारने केला होता. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने मोदी सरकारला फटकारले आहे. 

दोन हजार रुपयांच्या नोटांची नकली खाण रोज सापडत असून एकंदरीत सगळा सावळागोंधळ सुरु असल्याचे सेनेने म्हटले आहे. काश्‍मीर आणि छत्तीसगडमध्ये रक्ताचे सडे पडत आहे. काश्‍मीरमध्ये दहशतवाद्यांनी युद्ध पुकारले आहे. त्यांना पाकची मदत आहे. पण छत्तीसगडमध्ये पाकची मदत नाही. मग त्या नक्षलवाद्यांचा बीमोड करताना तुमचे हात का थरथरत आहे असा सवाल शिवसेनेने मोदी सरकारला विचारला आहे. मूठभर दहशतवादी निमलष्करी दलांना आव्हान देतात. या भ्याड हल्ल्यांमध्ये जवान शहीद होतात. हे कुठवर सहन करायचे असा सवालही सेनेने विचारला आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख