udhav thakray | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

पूर्णा घटनेच्या निषेधार्थ मातोश्रीवर मोर्चा

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 18 एप्रिल 2017

मुंबई : पूर्णा घटनेच्या निषेधार्थ शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थान "मातोश्री"वर निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. परभणी घटनेला शिवसेनेचे खासदार बंडू जाधव आणि पूर्णा नगरपालिकेचे नगराध्यक्षा एकलहरे यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी आंबेडकरी चळवळीतील सर्वपक्षीय, समविचारी संघटना मोर्चा काढणार आहेत. 

पूर्णा येथे डॉ.. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली आहे. यामध्ये एका नागरिका मृत्यू तर दोनशेजण जखमी झाले आहेत. यामुळे भीमजयंती मिरवणुकीवर केलेल्या अमानुष, हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबई आणि महाराष्ट्रातील आंबेडकरी पक्ष व संघटनांचे नेते कार्यकर्ते संविधान गौरव महामोर्चांच्या आयोजकांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्याचा निर्णय घेतल्याचे संयोजक अशोक कांबळे यांनी सांगितले. येत्या 23 एप्रिल रोजी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी काढला जाणार आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख