udhav thakray | Sarkarnama

शिवसेनेचे भाजपला पुन्हा ओरखडे

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 17 एप्रिल 2017

पुणे : इंदिरा गांधींची राजवट असताना बहुसंख्य राज्यांत कॉंग्रेसचीच सरकारे होती, पण सुवर्णकाळ काही आला नाही. "गरिबी हटाव'चा त्यांचा नारा लोकप्रिय ठरला, पण गरिबी काही हटली नाही याकडे लक्ष्य वेधत शिवसेनेने पुन्हा एकदा भाजपला ओरखडे काढत "एनडीए'च्या बैठकीत ज्या 33 पक्षांना "ताट व पाट' दिले त्या पक्षांबाबत तुमचे धोरण काय? याच सर्व मित्रांच्या मदतीने आजचे सुवर्णयुग अवतरले आहे याची आठवणही भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने ठेवावी असे शिवसेनेने म्हटले आहे. 

पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामनात शिवसेनेने पुन्हा एकदा भाजला टोले लगावले आहे. देशात भाजपची सत्ता आली आहे त्यामागे मित्र पक्षांचेही योगदान असल्याची जाणीव भाजप नेत्यांना करून दिली आहे. शिवसेना,अकाली दल, तेलगू देसमसारखे पक्ष आपापल्या राज्यात ताकदीने उभे आहेत. सत्तेत असो अगर नसो, शिवसेनेचा सुवर्णकाळ कधीच संपत नाही. सुवर्णकाळाच्या वाटचालीत मित्रांची साथ हवी आहे का ? यावरही एकदा स्पष्ट विवेचन व्हावे . सुवर्णकाळाचे निर्माते व साक्षीदार हे काळानुसार बदलत असतात. असे देशाचा इतिहास सांगतो असेही या लेखात म्हटले आहे. केवळ भाजपचीच सत्ता हवी, ही राजकीय महत्त्वाकांक्षा असली तरी आपल्या लोकशाहीत ती शंभर टक्के शक्‍य आहे काय? असा सवालही शिवसेनेने भाजपला केला आहे. दोन्ही पक्षात मनोमीलन झाल्याचे बोलले जात असले तरी शिवसेना भाजपवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख