उद्धव ठाकरे म्हणाले, याला म्हणतात मैत्री, आणि झाला टाळ्यांचा कडकडाट...

मुख्यमंत्रीपद आपण स्वीकारणार आहोत असे मान्य करताना श्री. ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीला काटे असतात, खिळे असतात जाणारा मुख्यमंत्री आणखी चार खिळे खुर्चीला ठोकून जातो मात्र आपल्या सर्वाच्या एकजुटीचा हातोडा मारून मी ते खिळे नीट करेन असे उद्धव टाकरे म्हणाल्यावर सभागृहात हशा उसळला.
 उद्धव ठाकरे म्हणाले, याला म्हणतात मैत्री, आणि झाला टाळ्यांचा कडकडाट...

मुंबई : आज मला सुप्रिया सुळे यांच्या निवडणुकीची आठवण येते. बाळासाहेब म्हणाले होते की सुप्रिया सुळे यांची निवड बिनविरोधच झाली पाहिजे. आणि आज.. असे म्हणून उद्धव ठाकरे थोडं थांबले.. आणि शरद पवार यांच्याकडे पाहत म्हणाले, इथे काही देणे घेणे नाही, पण याला म्हणतात मैत्री ! उद्दव ठाकरे यांनी अशा शब्दात शरद पवार यांनी, त्यांना मुख्यमंत्री होण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. आणि सभागृहात टाळ्यांचा जोरदार कडकडाट झाला. 

शरद पवार यांनी आपल्या भाषणांमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणी सांगून त्यांचा गौरव केला होता. आमचे स्नेही आज हयात नाहीत, पण मी त्यांचे अंतकरणापासून स्मरण करतो असेही शरद पवार म्हणाले होते. तो धागा पकडून उद्धव ठाकरे बोलताना म्हणाले पवारसाहेब आपला अनुभव, आपला आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू द्यावा. 
बाळासाहेब ठाकरे आज हयात नाहीत पण शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यात अत्यंत महत्वाची भूमिका बजावली. याचा उल्लेख करताना उद्धव ठाकरे म्हणाले आज साहेब हयात नाहीत पण याला म्हणतात मैत्री. उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्याला टाळ्यांचा कडकडाट करीत प्रतिसाद दिला. 

तीस वर्षे ज्यांच्याशी मैत्री होती त्यांनी विश्‍वास दाखवला नाही पण ज्यांच्याशी सातत्याने संघर्ष केला त्यांनी माझ्यावर विश्‍वास दाखवला आणि मला स्वीकारले असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले त्यावेळी देखील टाळ्यांचा कडकडाट झाला. 

मुख्यमंत्रीपद आपण स्वीकारणार आहोत असे मान्य करताना श्री. ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीला काटे असतात, खिळे असतात जाणारा मुख्यमंत्री आणखी चार खिळे खुर्चीला ठोकून जातो मात्र आपल्या सर्वाच्या एकजुटीचा हातोडा मारून मी ते खिळे नीट करेन असे उद्धव टाकरे म्हणाल्यावर सभागृहात हशा उसळला. 

आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छांनी मुख्यमंत्री झाल्यावर मी दिल्लीला जाईन, असे सांगून उद्धव ठाकरे नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता म्हणाले, दिल्लीत गेल्यावर मोठ्या भावाला जाऊन भेटेन (हशा) कारण त्यांनी जाहीर सभेत मला भाऊ म्हटलेले आहे. यावरही जोरदार टाळ्या वाजल्या. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com