udhav thakare and adavani | Sarkarnama

निकालाचे स्वागत, लालकृष्ण अडवाणींना भेटणार - उद्धव ठाकरे

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

रामजन्मभूमी खटल्याच्या निकालाचे स्वागत करताना ते म्हणाले, भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी यांनी या प्रश्‍नावर आंदोलन उभारले त्यांचे योगदान मोठे आहे. मी त्यांचीही भेट घेणार आहे. गेल्या वर्षी 24 नोव्हेंबरला मी अयोध्येला गेलो होतो त्यावेळी शिवनेरीवरील शिवजन्मभूमीवरची माती अयोध्येत नेली होती, माझी अशी श्रद्धा आहे की या मातीने हा चमत्कार केला आहे. मी आता एक दोन दिवसात शिवनेरीवर जाणार आहे

मुंबई : अनेक वर्षांचा हा प्रश्‍न संपला, आजचा दिवस सोनेरी आहे, मी न्यायदेवतेला वंदन करतो, मी लवकरच अयोध्येला जाणार आहे तसेच भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेणार असल्याचे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. राममंदिराच्या निकालाचे स्वागत करून ते म्हणाले या लढ्यात आजपर्यंत ज्यांनी बलिदान दिले त्यांना मी मुजरा करतो तसेच आज या निकालावेळी शिवसेनाप्रमुखांचे आठवण येत आहे त्यांनी ज्या काळात हिंदू म्हणणे टाळले जात होते त्या काळात गर्वसे कहो हम हिंदू है ही घोषणा बलवान केली. 

रामजन्मभूमी खटल्याच्या निकालाचे स्वागत करताना ते म्हणाले, भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी यांनी या प्रश्‍नावर आंदोलन उभारले त्यांचे योगदान मोठे आहे. मी त्यांचीही भेट घेणार आहे. गेल्या वर्षी 24 नोव्हेंबरला मी अयोध्येला गेलो होतो त्यावेळी शिवनेरीवरील शिवजन्मभूमीवरची माती अयोध्येत नेली होती, माझी अशी श्रद्धा आहे की या मातीने हा चमत्कार केला आहे. मी आता एक दोन दिवसात शिवनेरीवर जाणार आहे त्यानंतर अयोध्येत जाईन 24 तारखेला जाण्याचा माझा मानस आहे मात्र अयोध्येतील परिस्थिती पाहून माझा कार्यक्रम ठरवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारची स्थापना तसेच अन्य कुठल्याही प्रश्‍नांला उत्तरे देण्याचे टाळले. आजचा दिवस आनंद साजरा करण्याचा दिवस आहे त्यामुळे फक्त राममंदिर या विषयावरच बोलुया. राममंदिराच्या लढ्याची आठवण देताना त्यांनी अशोक सिंघल तसेच अटलबिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन, तसेच गोपीनाथ मुंडे यांची आठवण काढली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख