udhav thackrey oder to mla dont attack ncp | Sarkarnama

राष्ट्रवादीच्या विरोधात बोलू नका, उद्धव ठाकरेंचा प्रवक्‍त्यांना आदेश

सरकारनामा ब्युरो
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

मुंबई : महाराष्ट्रात सत्ता स्थापनेच्या पडद्यामागे हालीचाली गतीमान झाल्या असतानाच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या प्रवक्‍त्यांना राष्ट्रवादी विरोधात बोलू नका असा आदेश दिला आहे. 

मुंबई : महाराष्ट्रात सत्ता स्थापनेच्या पडद्यामागे हालीचाली गतीमान झाल्या असतानाच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या प्रवक्‍त्यांना राष्ट्रवादी विरोधात बोलू नका असा आदेश दिला आहे. 

शिवसेना भाजपपेक्षा कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अधिक जवळ जाताना दिसत आहे. राज्यात पुन्हा भाजपचे सरकार येणार की शिवसेनेचे याची उत्सुकता प्रचंड ताणली गेली आहे. उद्धव यांनी मातोश्रीवर शिवसेनेच्या सर्व प्रवक्‍त्यांना बोलावून सक्त आदेश दिला आहे की त्यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात एक ब्र ही काढू नये. उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेमुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या घरोब्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे बोलले जात आहे. 

शिवसेनेला बाहेरून पाठींबा देण्यासाठी कॉंग्रेस हायकमांडकडून ग्रीन सिग्नल मिळाल्याचेही समजते. कॉंग्रेस आमदारांचे त्यापुढेही एक पाऊल गेले आहे. बाहेरून पाठींबा देण्यापेक्षा थेट सत्तेत सहभागी होण्याची कॉंग्रेस आमदारांची हायकमांडकडे मागणी आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

टॅग्स


संबंधित लेख