udhav thackrey baners next matoshree | Sarkarnama

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्होणे महाराष्ट्राची गरज, मातोश्रीसमोर झळकले बॅनर्स 

रामनाथ दवणे 
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

मुंबई : विधानसभा निवडणूक शिवसेना- भाजपने युती करत लढली खरी मात्र सत्ता स्थापणेसाठी भाजप शिवसेना युतीमध्ये काडीमोड होतांना पहायला मिळत आहे. मातोश्री बाहेर युवा पक्षप्रमुख आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होणार असे बॅनर लावल्या नंतर आता पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत असे बॅनर झळकले आले आहे. 

मातोश्री बाहेर ही बॅनर लावण्याची वेळ सेनेवर का आली,मातोश्रीच्या गोटात अंतर्गत बंडाळीच्या भीतीचे सावट वाढत चालले आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे. गेली पाच वर्षे भाजप सेना सत्तेत असतांना सेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी मंत्री पदावर कारभार केला त्यांना ही मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडू लागली आहेत.यातील एखादा सूर मुख्यमंत्री पदासाठी बाहेर येईल,बंडाळी वाढेल याची भीती बाळगत मातोश्री ने आधीच आदित्य आणि नंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हावे असे बॅनरबाजी करून ठेवली आहे का असा राजकीय चर्चेला उधाण आले आहे. 

आदित्य ठाकरे हे युवा नेतृत्व आहे त्यात ते नव्याने आमदार झाल्याने, अनुभव नसल्याने त्यांचे नेतृत्व शिवसेनेच्या बड्या नेत्यांना साहजिकच नको आहे.आपले आमदार फुटू नयेत याची काळजी जरी मातोश्रीने घेतली असली तरीही मुख्यमंत्री पदी आदित्य अथवा उद्धव ठाकरे बसतील असे बॅनर लावत आपल्याच बड्या नेत्यांचे आवाज दाबुन ठेवले आहेत.अशातही शिवसेनेत ज्या बड्या नेत्यांना आपण मुख्यमंत्री होऊ अशी स्वप्न पडत आहेत त्यांनी बंडाळीचा सूर काढला तर याचा फायदा भाजप ही घेऊ शकते ही भीती ही मातोश्रीला आहे.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख