दलित मतांचे राजकारण करणार असाल तर  कोविंद यांना पाठिंबा नाही : उद्धव ठाकरे 

दलित मतांचे राजकारण करणार असाल तर  कोविंद यांना पाठिंबा नाही : उद्धव ठाकरे 

मुंबई : "" दलित मतांसाठी रामनाथ कोविंद यांचे नाव पुढे केलं असेल तर आम्हाला रस नाही अशी स्पष्ट रोखठोक भूमिका घेतानाच मध्यवधी लागल्या तर शिवसैनिक हे ठिणगी नाही वणव्या सारखं काम करतील. कोणामध्ये मस्ती असेल तर त्यांना सांगू इच्छितो हिम्मत असेल तर मध्यावधी घेवून दाखवाच,'' असे थेट आव्हानच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला आज दिले आहे. 

शिवसेनेच्या 51 व्या वर्धापन दिनानिमित्त मांटुंग्यातील षण्ममुखानंदर सभागृहात आयोजित सोहळ्यात ते बोलत होते. उद्धव ठाकरे म्हणाले, "" भाजपने दलित मतांचे राजकारण करण्याचे कारण काय ? दलित मतासाठी कोविंद यांचे नाव पुढे केले असेल तर आम्हाला त्यात रस नाही. आजपर्यंत शिवसेनेने कुणाच्या आडून राजकारण केले नाही. राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीबद्दल जे काही बोलायचे आहे ते उद्या बोलेन. शेतकऱ्यांचे भले व्हावे म्हणून आम्ही राष्ट्रपतीपदासाठी स्वामिनाथन यांचं नाव सूचवलं होते. हिंदू राष्ट्र आहे म्हणून आम्ही मोहन भागवतांचे नाव सुचवलं होतं. दलित समाजाची मते घेण्यासाठी जर दलित राष्ट्रपती देणार असाल तर शिवसेना पाठिंबा देणार नाही.'' 

शेतकऱ्यांच्या आंदोलनावर भाष्य करताना ठाकरे म्हणाले, "शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनात नुसता हात नाही तर संपूर्ण पाठिंबा होता. वेड्या वाकड्या अटी टाकून शेतकऱ्यांना गांगरुन टाकणार असाल तर ते कागद मी फाडून टाकेन. शेतकऱ्यांना द्यायचे असेल तर मोकळ्या मनाने आणि सढळ हाताने द्या, असे माझे सरकारला आवाहन आहे.'' 

कर्नाटक व्याप्त महाराष्ट्रात कानडी सरकार मराठी बांधवांवर भाषिक अत्याचार करतायत, मराठी माणसाच्या सहनशिलतेचा अंत पाहू नका, हे मराठी माणसाच्या पाठीशी उभं राहणारं सरकार नाही, आमच्या मराठी माणसाच्या मागे उभे राहणारे सरकार कुठे आहे ? कानडी सरकारला हे भाजपच सरकार दम का देत नाही असा सवाल ठाकरे यांनी केला. 

शिवसेना हा 51 वर्षाचा जुना पक्ष आहे यावर विश्वास बसत नाही. सर्व वर्धापन दिन पाहिलेत, तोच उत्साह आणि तीच जिद्द असल्याचे सांगत ठाकरे यांनी शिवसैनिकांनी मुंबई जिंकताना दाखवेल्या जिद्देला सलाम केला. मला मध्यावधीची परवा नाही, शेतकऱ्यांची जास्त चिंता आहे. शेतकऱ्यांचे आयुष्य वाचवण्याची चिंता शिवसेनेला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com