आझाद मैदानावरील मराठा आंदोलकांना उद्धव ठाकरे भेटले 

आझाद मैदानावरील मराठा आंदोलकांना उद्धव ठाकरे भेटले 

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतचा निर्णय फडणवीस सरकारने घेतल्यानंतर आज भाजप जल्लोष करीत असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मराठ्यांच्या समर्थनार्थ मातोश्रीच्या बाहेर पडले आहेत. ठाकरे यांनी आझाद मैदानावरील मराठा आंदोलकांची भेट घेतली आहे. 

"एटीआर' विधिमंडळात मांडण्यात आल्यानंतर भाजपच्या मंत्र्यांनी आणि आमदारांनी एकीडे जल्लोष साजरा केला असला तरी मराठा समाजातील विशेषत: मराठा क्रांती मोर्चाच्या नेत्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. सरकारने आरक्षणाचा निर्णय घेऊन मराठा क्रांती मोर्चाचे नेते सरकारवर टीका करीत आहेत.

गेल्या काही दिवसापासून आंदोलन करीत असलेल्या मराठा समाजातील कार्यकर्त्यांची दुपारी राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी भेट घेतली. त्यानंतर आता उद्धव ठाकरेही तेथे पोचले आहेत. 
उद्धव ठाकरे यांच्यासोबत युवा नेते आदित्य ठाकरेही आहेत. ठाकरे हे आझाद मैदान येथे पोचताच शिवसेना झिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या. 

मराठा आंदोलकांवर जे गुन्हे आहेत ते मागे घेण्याबरोबरच आंदोलनादरम्यान ज्या मराठा समाजातील व्यक्तीनी आपले प्राण दिले आहेत त्यांच्या घरातील प्रत्येकाला सरकारी नोकरीत सामावून घ्यावे अशी मागणी यावेळी आंदोलकांनी ठाकरे यांच्याकडे केली. यावेळी ठाकरे यांनीही मुख्यमंत्र्याकडे तशी मागणी करू आणि न्याय देण्याचा प्रयत्न करू असे सांगितले. दरम्यान, गेल्या काही दिवसापासून येथे सुरू असलेले आंदोलन आज मागे घेतले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com