महाविकास आघाडी दगडापेक्षा वीट मऊ : शेट्टी

महाविकास आघाडी दगडापेक्षा वीट मऊ : शेट्टी

राहाता :  किमान महाविकास आघाडी धार्मिक भेदवाद वगैरे करीत नाही. त्यामुळे आमच्या दृष्टीने ही आघाडी म्हणजे दगडा पेक्षा वीट मऊ म्हणायचे एवढेच, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली. 

पंतप्रधान पीक विमा योजना म्हणजे सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून शेतकऱ्यांची फसवणूक आणि कार्पोरेट विमा कंपन्यांचे कल्याण करणारी योजना आहे. महाविकास आघाडी सरकारने केलेली कर्जमाफी बिनकामाची आणि तकलादू आहे. भाजप आणि महाविकास आघाडी हे दोघेही शेतकऱ्यांसाठी काही करीत नाहीत.

शेट्टी म्हणाले, जो राजकीय पक्ष विरोधात असतो, त्यावेळी तो शेतकरी हिताच्या गप्पा मारतो. सत्तेत गेला की पायउतार झालेला पक्ष शेतकऱ्यांच्या बाजूने बोलू लागतो. सत्तेत असलेल्या पक्षावर जोपर्यत शेतकऱ्यांचा दबाव रहात नाही. तोपर्यत मागण्या मान्य होणार नाहीत. पीक विमा कंपन्या महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून लुटमार 

त्यांच्या विरोधात सर्व स्तरावर आम्ही पुराव्यानिशी तक्रारी केल्या. काहीही उपयोग झाला नाही. गेल्या तीन चार वर्षात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांना भरपाई मिळण्या ऐवजी विमा कंपन्या मालामाल झाल्या हे दुर्दैव आहे.

इथेनॉल खरेदीला देशव्यापी विरोध
मोदी सरकारने साखरेच्या किंमती प्रतिकिलो एकतीस रूपये स्थिर ठेवण्याचा चांगला निर्णय घेतला. मात्र देशातील तेल कंपन्या केंद्र सरकारच्या माध्यमातून ब्राझीलसोबत स्वस्त इथेनॉल खरेदीसाठी करार करण्याच्या तयारीत असल्याचे कळते. तसे झाले तर देशातील साखर उद्योग आणि ऊस उत्पादक अडचणीत सापडतील. आम्ही या करारास देशव्यापी विरोध करू, असा इशारा शेट्टी यांनी   दिला.

शाळा बंद कराल तर विरोध
कमी पटसंख्या असलेल्या वाड्या वस्त्यांवरील प्राथमिक शाळा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला, तर आम्ही त्यास जोरदार विरोध करू. या निर्णयामुळे शेतकरी व शेतमजुरांच्या मुला मुलींना शिक्षणाची दारे बंद होतील, असे मत शेट्टी यांनी व्यक्त केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com