मी उद्धव बाळासाहेब ठाकरे शपथ घेतो की...

मी उद्धव बाळासाहेब ठाकरे शपथ घेतो की...

मुंबई : तमाम शिवसैनिकांचे अढळ श्रद्धास्थान असलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना स्मरून तसेच ईश्‍वरसाक्ष शपथ घेतो की हे शब्द शिवतीर्थावर उमटले आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे जिव्हाळ्याचे ठिकाण असलेले शिवतीर्थ आणि 6.40 ची वेळ पाळत अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर विशेष बाब म्हणजे उद्धव टाकरे यांनी तमाम जनतेला नुसते हात हालवून अभिवादन न करता चक्क व्यासपीठावरून गुढघे टेकवून नमन केले. उद्धव यांनी भगवा अंगरखा परिधान केला होता. 


यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज ठकरे तसेच विविध पक्षाचे मान्यवर यावेळी उपस्थित होते. त्यांच्यासमवेत कॉंग्रेसच्या दोन तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दोन मंत्र्यांनी शपथ घेतली. शिवतीर्थावर यावेळी जनसागर लोटला होता. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com