udgir palika and congress with mim | Sarkarnama

उदगीर नगरपालिकेत कॉंग्रेस-एमआयएमची युती; भाजपाला धक्का

युवराज धोतरे
गुरुवार, 16 जानेवारी 2020

उदगीर : नगरपालिकेच्या विषय समिती सभापती पदाच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपाला एमआयएमच्या मदतीने कॉंग्रेसने धक्का दिला आहे. सहापैकी चार विषय समित्यांचे सभापती पद मिळवत कॉंग्रेस-एमआयएमने सत्ताधारी भाजपला दणका दिला. भाजपला केवळ दोन विषय समित्यांच्या सभापतीपदावर समाधान मानावे लागले. कॉंग्रेस नेते राजेश्‍वर निटुरे यांनी भाजपला रोखण्यासाठी एमआयएमशी जुळवून घेण्याची खेळी आखली होती, त्याला यश मिळाल्याने नगरपालिकेच्या विषय समित्या सभापतीपदावर कॉंग्रेसचा वरचष्मा राहिला. 

गुरुवारी (ता.16) पालिकेच्या सभागृहात झालेल्या निवडीत स्वच्छता समितीच्या सभापतीपदी विद्यमान उपनगराध्यक्ष सुधीर भोसले यांची तर महिला व बालकल्याण सभापती पदी सुशिलाबाई चव्हाण या भाजपच्या दोघांची निवड झाली. बांधकाम सभापतीपदी मंजूरखा पठाण, पाणीपुरवठा सभापती मेहबूब शेख या कॉंग्रेसच्या दोघांची तर शिक्षण व क्रीडा समितीच्या सभापतीपदी हाश्‍मी सय्यद रेश्‍मा इम्रोज व नियोजन समितीच्या सभापतिपदी निवृत्ती सांगवे या दोघा एमआयएमच्या सदस्यांची निवड झाली. स्थायी समितीवर सदस्य म्हणून भाजपाचे बापूराव येलमटे तर कॉंग्रेसचे राजकुमार भालेराव व बबिता भोसले यांची निवड झाली. 

उदगीर पालिकेवर भाजपाची सत्ता असून भाजपाचे 18, कॉंग्रेसचे 13, एमआयएमचे 6 असे पक्षीय बलाबल आहे. पण कॉंग्रेसने एमआयएमशी युती करत विषय समित्यांच्या सभापती पदाच्या निवडणुकीत भाजपला धक्का दिला. उदगीर नगरपालिकेत सात वेळा अध्यक्षपदाची धुरा सांभाळणारे कॉंग्रेसचे नेते राजेश्वर निटुरे यांनी गेल्या दोन दिवसापासून भाजपला धक्का देण्याची रणनिती आखली होती. त्यांची खेळी यशस्वी झाली असून त्यांच्या नेतृत्वात भाजपची सत्ता असतानाही पालिकेत कॉंग्रेसनचे वर्चस्व सिद्ध केले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख