उदगीरमध्ये सभापतिपदासाठी भाजपत रस्सीखेच, भाजपचा एक सदस्य फोडल्याने चुरस

कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना महाआघाडीच्या वतीने राष्ट्रवादीचे प्रा. शिवाजी मुळे यांनी सभापतिपदासाठी आव्हान निर्माण केले आहे. भाजपचा एक सदस्य यांना मिळाला असून, उपसभापती पदासाठी कॉंग्रेसचे बाळासाहेब मर्लापल्ले किंवा बंडखोर भाजप सदस्यांना संधी मिळू शकते अशी चर्चा सुरू आहे.
 उदगीरमध्ये सभापतिपदासाठी भाजपत रस्सीखेच, भाजपचा एक सदस्य फोडल्याने चुरस

उदगीर : पंचायत समिती सभापती, उपसभापती निवडी सोमवारी (ता.30) होणार आहेत. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाआघाडीने भाजपचा एक सदस्य फोडून भाजपसमोर आव्हान उभे केल्याने या निवडी आता चुरशीच्या होणार हे मात्र नक्की आहे. उदगीर पंचायत समिती ही भाजपच्या ताब्यात आहे. एकूण चौदा सदस्यसंख्या असलेल्या पंचायत समितीमध्ये भाजप नऊ, कॉंग्रेस तीन, राष्ट्रवादी व शिवसेना प्रत्येकी एक असे पक्षीय बलाबल आहे. भाजपचे निर्विवाद बहुमत असतानाही महाआघाडीने माजी आमदार समर्थक एका सदस्याला फोडण्यात यश मिळाल्याने व दुसरा सदस्य गळाला लागणार असल्याची चर्चा असल्याने भाजपसमोर आव्हान निर्माण केले आहे. 

भाजपकडून सध्या खुल्या प्रवर्गातील एकमेव पुरुष असलेल्या विजय पाटील यांचीच सभापतिपदाची वर्णी लागणार असल्याची चर्चा आहे. नागलगाव गणातून निवडून आलेल्या शारजा बाळे यांची सभापतिपदी वर्णी लागू शकते. उपसभापतिपदासाठी विद्यमान उपसभापती रामदास बेंबडे, रणजित कांबळे, तोंडार गणाच्या विजया पाटील, सुभाष कांबळे यांची नावे भाजपकडून चर्चेत आहेत. 

कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना महाआघाडीच्या वतीने राष्ट्रवादीचे प्रा. शिवाजी मुळे यांनी सभापतिपदासाठी आव्हान निर्माण केले आहे. भाजपचा एक सदस्य यांना मिळाला असून, उपसभापती पदासाठी कॉंग्रेसचे बाळासाहेब मर्लापल्ले किंवा बंडखोर भाजप सदस्यांना संधी मिळू शकते अशी चर्चा सुरू आहे. सध्या भाजपकडे आठ सदस्य असून, हे सर्व सदस्य सहलीवर गेल्याची चर्चा आहे. महाआघाडीकडे बंडखोर भाजपचा एक इतर पाच असे सहा सदस्यसंख्या असून, सद्यःस्थितीला भाजपचे पारडे जड आहे. सहलीला गेलेल्या भाजपच्या आठ सदस्यांपैकी जर कोणी फुटले तरच महाआघाडीचा चमत्कार घडू शकतो. अन्यथा भाजपची सत्ता येणार अशी शक्‍यता सध्यातरी व्यक्त केली जात आहे. 

माजी आमदार महाआघाडीसोबत 
भाजपच्या नऊ सदस्यांपैकी एक सदस्य फुटून महाआघाडीकडे गेला आहे. तो एका माजी आमदारांचा समर्थक असल्याने ते माजी आमदार सुद्धा महाआघाडी सोबतच असल्याचे यावरून दिसून येते, त्यामुळे चमत्कार घडू शकतो असे काही राजकीय जाणकारांचे मत आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com