कॉंग्रेस नामशेष, तर राष्ट्रवादीचाही बंधारा फुटला आहे - उद्धव ठाकरे

कॉंग्रेस नामशेष झाली असून राष्ट्रवादीचा सुद्धा बंधारा फुटला आहे. त्यामुळे,आता टीका कोणावर करायची असा हल्लाबोल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन्ही कॉंग्रेसवर पिंपरी-चिंचवडमध्ये केला. शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही,तर कर्जमुक्त करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कॉंग्रेस नामशेष, तर राष्ट्रवादीचाही बंधारा फुटला आहे - उद्धव ठाकरे

पिंपरीः कॉंग्रेस नामशेष झाली असून राष्ट्रवादीचा सुद्धा बंधारा फुटला आहे. त्यामुळे,आता टीका कोणावर करायची असा हल्लाबोल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन्ही कॉंग्रेसवर पिंपरी-चिंचवडमध्ये केला. शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही,तर कर्जमुक्त करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

फक्त एका रुपयात आरोग्य तपासणीची घोषणा करताना दहा रुपयात जेवण हे आपले आश्वासन नाही,तर वचन असल्याचा पुनरुच्चारही ठाकरे यांनी केला. 

पुणे जिल्ह्यात नारायणगाव (ता. आंबेगाव) आणि राजगुरुनगर (ता.खेड) येथे विधानसभा निवडणूक प्रचार सभा घेतल्यानंतर ते पिंपरीत दिवसातील तिसऱ्या सभेत बोलत होते. राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे यांनी यावेळी शिवसेनेत प्रवेश केला. 

राज्यात सूडाचे राजकारण केले असल्याच्या विरोधकांच्या आरोपाचा ठाकरे यांनी यावेळी समाचार घेतला. ते जेव्हा सत्तेमध्ये होते. तेव्हा काय न्यायाने राजकारण करत होते का अशी विचारणा त्यांनी केली.  कॉंग्रेस-राष्ट्रवादीने देण्याचे नव्हे तर घेण्याचे काम केले. म्हणून त्यांच्या मागे चौकशीचा हा ससेमिरा लागला आहे. सिंचनाचे 70 हजार कोटी रुपये गेले कुठे ?, शिखर बॅंकेचा पैसा गेला कुठे ? हे शोधायला नको का अशी विचारणा  त्यांनी केली. 

शिवसेना, भाजपमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवरुन नक्की वाद होते, अशी कबुली त्यांनी दिली. मात्र, ते आता संपले आहेत, असेही ते पुढे म्हणाले. थकलेल्या विरोधी पक्षांकडून उज्वल भवितव्याची कशी अपेक्षा कराल अशी खोचक टिपण्णीही त्यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com