Uddhay Thakrey on Farmers | Sarkarnama

शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरावे लागणार नाही असा कारभार हवा - उद्धव ठाकरे

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 25 एप्रिल 2017

शेतकऱ्यांना एकदा तरी पूर्णपणे कर्जमुक्त केले पाहिजे ही शिवसेनेची मागणी आहे. तूर उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न इतका ताणला जाण्याची गरज नव्हती. मंत्रिमंडळ बैठकीच्या आमच्या मंत्र्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आणि तुर खरेदी करण्याचा निर्णय घ्यायला भाग पाडले - उद्धव ठाकरे

मुंबई - ''शेतकरी परिस्थितीचा शिकार बनत आलेला आहे. शेतकरी रस्त्यावर उतरले तेव्हाच पटकन दखल सरकारने घेतली पाहिजे होती. शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरण्याची गरज लागणार नाही असा कारभार केला पाहिजे,'' अशीअपेक्षा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज येथे व्यक्त केली. मातोश्री या आपल्या निवासस्थानी ते पत्रकरांशी बोलत होते.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, ''शेतकऱ्यांना एकदा तरी पूर्णपणे कर्जमुक्त केले पाहिजे ही शिवसेनेची मागणी आहे. तूर उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न इतका ताणला जाण्याची गरज नव्हती. मंत्रिमंडळ बैठकीच्या आमच्या मंत्र्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आणि तुर खरेदी करण्याचा निर्णय घ्यायला भाग पाडले'' शिवसेनेने हा पवित्रा शेतकऱ्यांसाठी घेतला असून मुख्यमंत्र्यांनी याला प्रतिसाद दिला त्याबद्दल त्यांचे आभारही ठाकरे यांनी मानले.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, ''आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांसाठी मदत द्या, अशी बातमी वाचली, एखादा जिल्हा आत्महत्याग्रस्त होईपर्यंत वाट न पाहता शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येऊ देऊ नये हे अपेक्षित आहे.''  शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्यासारखी परिस्थिती असल्याचे सांगत शिवसेना शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. असेही ठाकरे यावेळी म्हणाले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख