मराठवाड्यात विद्यमान आमदारांसाठी उद्धव ठाकरेंच्या सभा नाहीत?

मुंबईतील दसरा मेळाव्यात घणाघाती भाषण करत राज्याचे लक्ष वेधून घेतल्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे उद्या (ता.10) औरंगाबादेत दाखल होत आहेत. शिवसेनेचे वैजापूर, कन्नड आणि औरंगाबाद मध्य मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारार्थ त्यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. पश्‍चिममध्ये भाजपने केलेली बंडखोरी, गंगापूरच्या मानेंनी राष्ट्रवादीत केलेला प्रवेश, लोकसभा निवडणुकीतील पराभवाला जबाबदार ठरलेले शिवसेनेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यासह शहरातील नागरी प्रश्‍नांवर उध्दव ठाकरे काय बोलणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
Shivsena Chief Uddhav Thakrey
Shivsena Chief Uddhav Thakrey

औरंगाबाद : मुंबईतील दसरा मेळाव्यात घणाघाती भाषण करत राज्याचे लक्ष वेधून घेतल्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे उद्या (ता.10) औरंगाबादेत दाखल होत आहेत. शिवसेनेचे वैजापूर, कन्नड आणि औरंगाबाद मध्य मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारार्थ त्यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. पश्‍चिममध्ये भाजपने केलेली बंडखोरी, गंगापूरच्या मानेंनी राष्ट्रवादीत केलेला प्रवेश, लोकसभा निवडणुकीतील पराभवाला जबाबदार ठरलेले शिवसेनेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यासह शहरातील नागरी प्रश्‍नांवर उध्दव ठाकरे काय बोलणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

राज्यात युती झाल्यानंतर उध्दव ठाकरे शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी निघाले आहेत. नगर जिल्ह्यातील दौरा संपवून गुरुवारी ते औरंगाबादेत येणार आहेत. दुपारी तीन वाजता वैजापूरात प्रा. रमेश बोरनारे, चार वाजता कन्नड येथे उदयसिंग राजपूत तर सायंकाळी 7 वाजता मध्यचे प्रदीप जैस्वाल यांच्यासाठी ते शहरात जाहीर सभा घेणार आहेत.

पश्‍चिम विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे संजय शिरसाट यांच्या विरोधात भाजपचे राजू शिंदे यांनी बंडखोरी केली आहे. तर कन्नड विधानसभा मतदारसंघात हषवर्धन जाधव पुन्हा एकदा शिवसेनेच्या विरोधात उभे ठाकले आहेत. तर लोकसभा निवडणुकीत शहरातील कचरा, पाणी प्रश्‍नाचा फटका शिवसेनेला बसला होता. विधानसभा निवडणुकीत यावर युती कशी मात करणार? हा प्रश्‍न कायम असतांना उध्दव ठाकरे या विषयांना हात घालतात का? याकडेही सगळ्यांचे लक्ष राहणार आहे.

विद्यमान आमदारांसाठी सभा नाही
औरंगाबाद जिल्ह्यातील मध्य, पश्‍चिम, वैजापूर, कन्नड, पैठण आणि सिल्लोड या सहा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत. पैकी वैजापूर, कन्नड आणि औरंगाबाद मध्य मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठीच उध्दव ठाकरे यांच्या सभा होणार आहेत.

पैठण, सिल्लोड आणि पश्‍चिम या मतदारसंघात विद्यमान आमदारच पुन्हा निवडणूक लढवत असल्यामुळे अशा मदारसंघात उध्दव ठाकरे सभा घेणार नसल्याचे समजते. पैकी पश्‍चिम मतदारसंघांचा बहुतांश भाग शहरात येत असल्याने उध्दव ठाकरे यांच्या सभेचा शिरसाट यांना देखील लाभ होणार आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com