राज ठाकरेंच्या पुण्यातील सभेशी क्लॅश होत असल्याने पिंपरीतील उद्धव ठाकरेंची सभा स्थगित?

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची विधानसभा निवडणूक प्रचाराच्या पहिल्या टप्यातील पिंपरी-चिंचवडमधील बुधवारची (ता.९) सभा अचानक आज स्थगित झाली. त्यामुळे शहर शिवसेनेचा व त्यातही पिंपरीतील पक्षाचे उमेदवार व त्यांच्या समर्थकांचा काहीसा हिरमोड झाला आहे. कारण,या सभेच्या तयारीसाठी काल शहर शिवसेनेची बैठकही आयोजित करण्यात आली होती. दरम्यान, याच दिवशी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची पुण्यात सभा असल्याने उद्धव ठाकरेंची सभा पुढे ढकलण्यात आल्याची चर्चा आहे.
Raj Thakrey - Uddhav Thakrey
Raj Thakrey - Uddhav Thakrey

पिंपरी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची विधानसभा निवडणूक प्रचाराच्या पहिल्या टप्यातील  पिंपरी-चिंचवडमधील बुधवारची (ता.९) सभा अचानक आज स्थगित झाली. त्यामुळे शहर शिवसेनेचा व त्यातही पिंपरीतील पक्षाचे उमेदवार व त्यांच्या समर्थकांचा काहीसा हिरमोड झाला आहे. कारण,या सभेच्या तयारीसाठी काल शहर शिवसेनेची बैठकही आयोजित करण्यात आली होती. दरम्यान, याच दिवशी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची पुण्यात सभा असल्याने उद्धव ठाकरेंची सभा पुढे ढकलण्यात आल्याची चर्चा आहे.

शिवसेनेच्या युवासेनेचे प्रमुख व उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य यांच्यासमोर मुंबईत वरळीत मनसेने उमेदवार दिलेला नाही.हे एक पाऊल त्यांनी पुढे टाकल्याने शिवसेनेनेही संघर्षाऐवजी सामंजस्याची भूमिका मनसेबाबत घेतल्याचे समजते. त्याला ही सभा पुढे ढकलून दुजोराही मिळाला आहे. आता, त्यादिवशी उद्धव ठाकरेंची सभा पिंपरीऐवजी नगर येथे होणार आहे, असे समजते. तर, पिंपरीतील सभा ही आता शेवटच्या टप्यात होणार आहे,असे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख (मावळ) गजानन चिंचवडे व पिंपरीचे आमदार व उमेदवार अॅड. गौतम चाबूकस्वार यांनी सांगितले. ठाकरेंच्या संपूर्ण राज्य दौऱ्याचीच फेररचना करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

दुसरीकडे याच दिवशी म्हणजे नऊ तारखेला राज ठाकरे पुण्यात सभा घेऊन राज्यातील प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. कारण नऊ हा आकडा त्यांचा शुभांक आहे.त्यामुळे त्या दिवसापासून त्यांनी प्रचार सुरु करण्याचे ठरवले आहे. भले,अजून त्यासाठी त्यांना पुण्यात अजून मैदान मिळालेले नाही. ते मिळाले नाही,तर ही सभा रस्त्यात टिळक चौकात घेण्याचे मनसेने ठरविल्याने पोलिसांचीच पंचाईत झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com