उद्धव ठाकरेंचे पुन्हा 'जय श्रीराम'

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने पुन्हा एकदा राम मंदिराच्या मुद्द्याला हात घातला असून राम मंदिराची पहिली वीट शिवसेनाच रचणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. राम मंदिर मुद्द्यावर शिवसेना नेहमी आग्रही राहिली आहे. काश्मीर प्रश्नी सरकारने तातडीने निर्णय घेतला त्या प्रमाणे राम मंदिरचा धाडसी निर्णय सरकारने घ्यावा, असे आवाहन उध्दव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केले.
Uddhav Thakrey
Uddhav Thakrey

मुंबई  : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने पुन्हा एकदा राम मंदिराच्या मुद्द्याला हात घातला असून राम मंदिराची पहिली वीट शिवसेनाच रचणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. राम मंदिर मुद्द्यावर शिवसेना नेहमी आग्रही राहिली आहे. काश्मीर प्रश्नी सरकारने तातडीने निर्णय घेतला त्या प्रमाणे राम मंदिरचा धाडसी निर्णय सरकारने घ्यावा, असे आवाहन उध्दव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केले.

पाकिस्तानला आधी उत्तर दिलं आहे, आता पुन्हा एकदा त्यांना त्यांच्या भाषेत उतर द्यायला हवं, ती वेळ आता आली आहे, असे पाकिस्तान प्रकरणी उध्दव ठाकरे म्हणाले. युतीचं आम्ही बघू असे म्हणत उध्दव ठाकरेंनी युतीच्या जागा वाटपाबाबत प्रतिक्रिया देणे टाळले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लोकसभेत जनतेने जागा दाखवली आहे. देशभक्ती समोर काही नाही, अशी प्रतिक्रिया उध्दव ठाकरे यांनी शरद पवारांनी पाकिस्तानची स्तुती केल्याप्रकरणी दिली.

'आरे' प्रमाणेच नाणार रिफायनरी प्रकल्पाचा विषय देखील होता. शिवसेनेने नाणारचा विषय हाती घेऊन तडीस नेला. त्या प्रमाणेच आरेतील कारशेडचा विषय मार्गी लागेल, असे उध्दव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com