चंद्रभागेनंतर उध्दव ठाकरेंची आता फेब्रुवारीमध्ये गोदावरीची आरती! 

शिवसेनेतर्फे शरयू (आयोध्या), चंद्रभागा (पंढरपूर) त्यानंतर आता नाशिकला शिवसेनेतर्फे गोदावरीची महाआरती होणार आहे. गोदावरी महाआरतीच्या निमित्ताने होणारा हा लोकसभा, विधानसभा निवडणुकीचा जागर असेल. पुढील आठवड्यातील दुष्काळ पाहणी दौऱ्यानंतर नाशिकचा दौरा अपेक्षीत आहे.
चंद्रभागेनंतर उध्दव ठाकरेंची आता फेब्रुवारीमध्ये गोदावरीची आरती! 

नाशिक : पंढरपुरला चंद्रभागा नदीची आरती आणि सभेनंतर शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरेंचा आता नाशिकचा दौरा होणार आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ठाकरे नाशिकच्या तीर्थाटनाला येत आहेत. यावेळी ते काळाराम मंदिरात पुजा करतील. रामकुंडावर सायंकाळी गोदावरीची आरती करणार आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना तयारीला लागण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. 

शिवसेनेतर्फे शरयू (आयोध्या), चंद्रभागा (पंढरपूर) त्यानंतर आता नाशिकला शिवसेनेतर्फे गोदावरीची महाआरती होणार आहे. गोदावरी महाआरतीच्या निमित्ताने होणारा हा लोकसभा, विधानसभा निवडणुकीचा जागर असेल. पुढील आठवड्यातील दुष्काळ पाहणी दौऱ्यानंतर नाशिकचा दौरा अपेक्षीत आहे. यासंदर्भात शिवसेना नेते संजय राऊत यांच्या दौऱ्यात त्याविषयी प्राथमिक चर्चा झाली. त्यानंतर तयारीसाठी आवश्‍यक सुचना स्थानिक पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या. 

मात्र, ठाकरे यांचा अंतिम कार्यक्रम अद्याप झालेला नाही. यादृष्टीने काळाराम मंदिरात पुजा, रामकुंडावर महाआरती हे प्रमुख कार्यक्रम असतील. जानेवारी अखेरीस लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहिर होण्याची शक्‍यता आहे. तसे झाल्यास मात्र हे कार्यक्रम स्थगित होतो की कसे याविषयी उत्सुकता आहे. 

- "शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांचा दौरा अपेक्षीत आहे. मात्र त्यांचा अंतिम कार्यक्रम निश्‍चित झालेला नाही. सुचना येताच सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते नियोजन यशस्वी करतील.'- अजय बोरस्ते, शिवसेना नेते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com