शिर्डी मतदारसंघाचे नियोजन उध्दव ठाकरेंनी दिले येवल्याच्या नरेंद्र दराडेंकडे

शिर्डी मतदारसंघाचे नियोजन उध्दव ठाकरेंनी दिले येवल्याच्या नरेंद्र दराडेंकडे

येवला : शिवसेनेकडून लोकसभा निवडणुकीचे 'मायक्रो प्लॅनींग' सुरु करण्यात आले आहे. त्यासाठी शिर्डी मतदारसंघाची जबाबदारी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आमदार नरेंद्र दराडे यांच्याकडे दिली आहे. ही जागा राखण्यासाठी लवकरच घर तीथे शिवसेना अशी मोहिम सुरु केली जाणार आहे. त्याचे नियोजन आजपासून सुरु करण्यात आले आहे.

येवला येथील नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार नरेंद्र दराडे यांची आज शिवसेनेच्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या संपर्कपदी नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीमुळे पक्षाने दराडे यांच्या कामाची दखल घेतली. पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी ही नियुक्ती जाहीर केली आहे. संघटनात्मक बांधणीसाठी जास्तीत जास्त वेळ देऊन मतदारसंघात पक्षातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांत समन्वय निर्माण करण्याचे काम आमदार दराडे यांच्याकडे दिले आहे. पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ही नियुक्ती झाली. त्यामुळे शिर्डी मतदारसंघात पक्षाचे काम व निवडणुकीच्या मोर्चेबांधणीत ते कसे यशस्वी होतात याविषयी उत्सुकता आहे.

शिर्डी मतदारसंघात २०१४  मध्ये शिवसेनेचे लोखंडे विजयी झाले होते. यंदा शिसेना, भारतीय जनता पक्षाते युतीच्या अनिश्‍चिततेमुळे येथील उमेदवाराविषयी अद्याप निर्णय झालेला नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आणदार वैभव पिचड आणि संगमनेरला कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या मतदारसंघात त्याचा समावेष आहे. त्यामुळे कॉंग्रेसच्या या बालेकिल्ल्यात शिवसेनेला यंदा आपली जागा राखने एक आव्हान आहे. त्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेला संघटनात्मक स्तरावर प्रभावी कारम करण्याचे पक्षांतर्गत आव्हान आहे.

शिर्डी लोकसभा मतदारसंघातील पक्षाचे काम अधिक वेगाने व विस्ताराने करण्यास माझे प्राधान्य असेल. पक्षाने माझ्यावर जबाबदारी सोपविली आहे. शिर्डी मतदारसंघात शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी स्थानिक पदाधिकार्यांना सोबत घेऊन काम करेन. - आमदार नरेंद्र दराडे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com