uddhav thakre birthday 27 july | Sarkarnama

आजचा वाढदिवस : उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 27 जुलै 2019

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रातील एक वजनदार नेते म्हणून ओळखले जातात. त्यांचे नाव आता राज्यापुरते मर्यादित राहिले नाही तर त्यांची दखल देशपातळीवरही घेतली जाते. बाळासाहेब असतानाच ते पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष बनले होते. एक उत्कृष्ठ छायाचित्रकार म्हणूनही त्यांची ओळख आहेत. शिवसेना स्थापन होऊन पाच दशके होऊन गेली. या पक्षाने आतापर्यंत अनेक चढउतार पाहिले. बाळासाहेबांच्या पश्‍चात शिवसेनेचे धुरा खांद्यावर घेतानाच पक्षाला उभारी देत आले. बाळासाहेबांनंतर ते शिवसेनाप्रमुख बनतील असेही बोलले जात होते.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रातील एक वजनदार नेते म्हणून ओळखले जातात. त्यांचे नाव आता राज्यापुरते मर्यादित राहिले नाही तर त्यांची दखल देशपातळीवरही घेतली जाते. बाळासाहेब असतानाच ते पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष बनले होते. एक उत्कृष्ठ छायाचित्रकार म्हणूनही त्यांची ओळख आहेत. शिवसेना स्थापन होऊन पाच दशके होऊन गेली. या पक्षाने आतापर्यंत अनेक चढउतार पाहिले. बाळासाहेबांच्या पश्‍चात शिवसेनेचे धुरा खांद्यावर घेतानाच पक्षाला उभारी देत आले. बाळासाहेबांनंतर ते शिवसेनाप्रमुख बनतील असेही बोलले जात होते. पण, शिवसेनाप्रमुख एकच ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे. त्यामुळे शिवसेनाप्रमुख हे नाव घेता पक्षप्रमुख म्हणून ज्यांनी जबाबदारी स्वीकारली. बाळासाहेबांचा वारसा ते यशस्वीपणे चालवित
आहेत. सरपंच, आमदार, खासदार, मंत्री शिवसेनेचे आहेत. राज्यात या पक्षाचे मोठे जाळे पसरले आहे. 

राजकीय कारकीर्द 
आरंभीच्या काळात उद्धव ठाकरे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्राच्या कामकाजात सक्रिय होते. निवडणुकांच्या काळात शिवसेनेच्या प्रचारयंत्रणेतही त्यांचा सहभाग असे. हळुहळू पक्षाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. पक्षात त्यांचा शब्द अंतिम मानला जातो. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख