अखेर दिलीप माने शिवबंधनात !

.
Dilip-Mane-enters-shivsena
Dilip-Mane-enters-shivsena

सोलापूर : आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेसचा हात सोडून माजी आमदार दिलीप माने यांनी शिवसेनेचे धनुष्य हातात घेतले. बुधवारी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलीप माने यांना शिवबंधन बांधले. 

माजी आमदार दिलीप माने यांच्यासोबत शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी सोलापुरातून शेकडो समर्थक मुंबईकडे दाखल झाले आहेत. दिलीप माने यांच्यासोबत जलसंधारण मंत्री तानाजी सावंत, खासदार ओमराजे निंबाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश वानकर, नगरसेवक जयकुमार माने, माने यांचे चिरंजीव पृथ्वीराज माने, माजी नगरसेवक नागेश ताकमोगे आदी सोबत होते. 

हातात भगवा घेतल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलीप माने यांना शिवबंधन बांधले. त्यानंतर मातोश्रीच्या बाहेर येवून उद्धव ठाकरे यांनी माने समर्थकांशी संवाद साधला. माने हे आता शिवबंधनात अडकले आहेत, त्यांना शिवसेनेची ताकद देवू. कोणालाही अंधारात ठेवून शिवसेनेत घेतले नाही, असे ठाकरे यांनी यावेळी सांगितले. यावेळी माने समर्थकांशी मातोश्री बाहेर जोरदार शक्तीप्रदर्शन केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com